Jalgaon ZP Recruitment : जिल्हा परिषदेंतर्गत एकूण १७ संवर्गांगातील सहाशेहून अधिक पदांसाठी ५ ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची ६२६ पदे भरली जाणार आहेत. एका पदासाठी संपूर्ण राज्यात एकाचवेळी परीक्षा होणार असून, उमेदवारांनी शक्यतो एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. (626 posts will be recruited in Jalgaon Zilla Parishad Process from 5th August jalgaon)
रखडलेल्या प्रक्रियेस अखेर सुरवात
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली बहुचर्चित जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरू होणार असून, भरती प्रक्रियाची जाहिरात ५ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे.
संपूर्णपणे ऑनलाईन पार पडणाऱ्या या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागातील १७ संवर्गातील एकूण ६२६ पदे भरण्यात येणार आहेत. राज्य पातळीवरील आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाइन परीक्षाद्वारे ही भरती प्रक्रिया होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार असल्यामुळे संपूर्णपणे पारदर्शकता यात असणार आहे. उमेदवारांनी ठरवून दिलेल्या विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्हा परिषदेची संपूर्ण तयारी झाली असून, भरती प्रक्रिया योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी दिली.
"जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस कंपनीमार्फत होणार आहे. यामुळे या भरती प्रक्रियेत संपूर्णपणे पारदर्शकता असेल. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांनी मुदतीत अर्ज करावेत." -अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.