Rajya Natya Spardha 2023 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होत असलेल्या ६२ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धा शुक्रवार (ता. २४)पासून जळगाव केंद्रावर सुरू होत आहेत.
दर वर्षी या स्पर्धा भरविल्या जातात. साधारणपणे १२ ते १८ एकांकिका या स्पर्धेत जळगाव केंद्रावर सादर केल्या जातात. यंदाही ही स्पर्धा जळगाव शहरातील महाबळ मार्गावरील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार आहे. रोज सायंकाळी सातला नाटक सादर होईल. (62nd Rajya Natya Spardha from today at Jalgaon news)
अशी सादर होतील नाटके
शुक्रवार (ता. २४) : प्रा. दिलीप परदेशीलिखित व अभिनय देशमुख दिग्दर्शित ‘थेंब थेंब आभाळ’
शनिवार (ता. २५) : भगवान हिरेलिखित, पंकज सनेर दिग्दर्शित ‘गोदो वन्स अगेन’
रविवार (ता. २६) : रमेश भोळेलिखित, महेंद्र खेडकर दिग्दर्शित ‘संपेल का कधीही हा खेळ सावल्यांचा’
सोमवार (ता. २७) : इरफान मुजावरलिखित, वैभव मावळे दिग्दर्शित ‘मजार’
मंगळवार (ता. २८) : रत्नाकर मतकरीलिखित, क्षमा वासे-वसईकर दिग्दर्शित ‘निखारे’
बुधवार (ता. २९) : विजय तेंडुलकरलिखित, रमेश भोळे दिग्दर्शित ‘विठ्ठला’
गुरुवार (ता. ३०) : सोनल चौधरीलिखित व दिग्दर्शित ‘अंकल वान्या’
शुक्रवार (ता. १) : विभावरी मोराणकरलिखित, प्रांजल पंडित दिग्दर्शित ‘ती’
सोमवार (ता. ४) : रोहित पगारेलिखित, किरणकुमार अडकमोल दिग्दर्शित ‘चांदणी’
मंगळवार (ता. ५) : डॉ. हेमंत कुलकर्णीलिखित, अपूर्वा कुलकर्णी दिग्दर्शित ‘हम दो NO’
गुरुवार (ता. ७) : हृषीकेश तुराईलिखित, विशाल जाधव दिग्दर्शित ‘म्याडम’
शुक्रवार (ता. ८) : शरद भालेरावलिखित, चिंतामण पाटील दिग्दर्शित ‘होय, हे हिंदू राष्ट्र आहे’
शनिवार (ता. ९) : राहुल सोनवणेलिखित, प्रदीप भोई दिग्दर्शित ‘पेढे घ्या पेढे’
रविवार (ता. १०) : अनिल कोष्टीलिखित, पुष्कराज शेळके दिग्दर्शित ‘उभ्या पिकातलं ढोरं’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.