drowning death esakal
जळगाव

Jalgaon News: वाळूमाफियांनी घेतला आव्हाण्यातील शेतकऱ्याचा बळी! पोहणाऱ्यांनी प्राणाची बाजी लावली, पण...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आव्हाणे (ता. जळगाव) येथील ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा पाय घसरून गिरणा नदीतून बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

मधुकर बाबूराव ढोले (भोई), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्रात केलेल्या अवैध उत्खननामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम डोहात बुडून मधुकर ढोले यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (65 year old farmer from Avhane Jalgaon death drowned Girna river due to sand mafia news)

आव्हाणे येथील शेतकरी मधुकर ढोले रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतात जाण्यासाठी घरातून निघाले. गावातून जाणाऱ्या गिरणा नदीपात्र ओलांडत असताना, त्यांचा पाय घसरला. ते नदीपात्रातील डोहात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोहणाऱ्यांची शिकस्त

मधुकर ढोले डोळ्यादेखत नदीपात्रात पडल्यानंतर नदीकाठावर असलेल्या काही पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांनी क्षणार्धात नदीत उड्या घेतल्या. त्यांचा शोध घेत त्यांना बाहेर काढले.

खासगी वाहनाने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत असताना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाइकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, आव्हाणे गाव वाळूमाफियांच्या कार्यक्षेत्राचे गाव म्हणून ओळखले जाते. राज्यभर वाळूउपसा बंद असताना, बारमाही वाळूचे उत्खनन व चोरी याच गावालगत असलेल्या नदीपात्रातून होते.

गिरणापात्रातून बारा महिनेही २४ तास होणाऱ्या अवैधपणे वाळू उपशामुळे नदीपात्रात कृत्रिम डोह तयार झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या डोहात बुडून विद्यार्थी, ग्रामस्थ आणि तरुणांचा बळी जातो.

वयोवृद्ध शेतकरी मधुकर ढोले यांच्या मृत्यूला वाळूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. मृत मधुकर यांच्या पश्चात तीन मुले, दोन विवाहित मुली आहेत.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक ईश्वर लोखंडे प्राथमिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT