जळगाव

Jalgaon Crime : भुसावळला 7 घरफोड्या उघड; दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाणे हद्दीतील सात घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

तसेच संशयितांकडून सोन्याचे व चांदीचे दागीने, मोबाईल, गॅस सिलिंडर असा एकूण दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केला आहे. (7 burglaries revealed in Bhusawal 4 suspects arrested jalgaon crime news)

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घरफोड्यांमधील संशयितांचा शोध घेऊन संशयित शेख मुश्ताक शेख अनवर (वय २३), सोहेल शेख अय्युब (वय १८), आफताफ शेख समिउल्ला (वय २२), जुबेर शेख कमरू (वय २६), तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन घरफोड्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी संगनमताने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे तसेच तालुका पोलिस ठाण्यातील सात घरफोडी गुन्ह्याची केल्याची कबुली दिली आहे.

या संशयितांकडून एकूण दोन लाख सहा हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागीने, मोबाईल, तसेच गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या संशयिताना बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या संशयितांची १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे (अतिरिक्त पदभार), पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलिस कर्मचारी सुनील जोशी, विजय नेरकर, नीलेश चौधरी, यासीन पिंजारी, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार, अमर अढाळे यांनी मिळून केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT