MLA Farooq Shah at the groundbreaking ceremony of the new administrative building of the State Excise Department. esakal
जळगाव

Dhule News : 7 कोटींतून राज्य उत्पादनची इमारत; आमदार फारूक शाह यांच्या हस्ते भूमिपूजन

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारत कामाचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ९) भूमिपूजन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारत कामाचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ९) भूमिपूजन करण्यात आले. शहरातील हॉलेट रेसिडेन्सीच्या मागील परिसरात सात कोटी रुपये खर्चातून ही इमारत बांधण्यात येणार आहे.

धुळे शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाडेतत्त्वावर आहेत. पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. (7 Crore State Production Building Bhumi Pujan by MLA Farooq Shah dhule news)

या समस्या लक्षात घेऊन आरटीओ कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, हिरे मेडिकल कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी विविध विभागांच्या इमारतीसाठी आपण शासनाकडून कोट्यवधी रुपये निधी आणला.

त्याचाच एक भाग असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदींतर्गत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे सात कोटींच्या कामाचे भूमिपूजन झाल्याचे आमदार शाह यांनी सांगितले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, भिकन शाह, आसिफ शाह, कैलास गर्दे, नासिर पठाण, आमीर पठाण, डॉ. दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, हारून खाटीक, डॉ. बापूराव पवार.

अफसर शाह, शादाब खाटीक, शाहरुख शाह, समीर शाह आदी उपस्थित होते. दरम्यान, शहरात सर्व शासकीय विभागांसाठी प्रशासकीय प्रस्तावित असून, या इमारतीचे कामही लवकरच सुरू होईल, असेही आमदार शाह यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT