Indian Railway esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वेला 77 टक्के महसूल Online Bookingमधून

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एकविसाव्या शतकात कोणालाही थांबण्यासाठी वेळ नाही. ज्याला त्याला आपले काम तत्काळ करून हवे असते. डिजिटल माध्यमातून एका क्षणात कोणतीही बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचते. काही वर्षांपूर्वी रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी तासन्‌तास रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, कोरोनानंतर व्यवहार ऑनलाइन झाले.

त्यात रेल्वेही मागे नाही. रेल्वेला अधिक महसूल रेल्वे प्रवाशांनी आरक्षित केलेल्या तिकिटांमधून मिळतो. यामुळे रेल्वेने विविध ॲप्सची निर्मिती केली व वेबसाइटवरही सुविधा केली. यामुळे ७७ टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट बुकिंगला पसंती देतात, तर २३ टक्के प्रवासी प्रत्यक्ष जाऊन तिकीट काढतात. नोव्हेंबर महिन्यात रेल्वेला १३५ कोटी ३६ लाखांची कमाई यातून झाली. गेल्या वर्षीच्या १२० कोटींपेक्षा १२.८० टक्के ती जास्त आहे. (77 percent revenue to Railways from Online Booking Jalgaon News)

नोव्हेंबर महिन्यात भुसावळ विभागात ऑनलाइन आरक्षित पीआरएस तिकिटांतून ७७ टक्के कमाई (तिकिटांच्या ७३ टक्के संख्येने) ऑनलाइन बुकिंगद्वारे झाली आहे. उर्वरित २३ टक्के कमाई (उर्वरित २७ टक्के तिकिटांच्या संख्येने) स्टेशन विंडो तिकिटांद्वारे केली जाते. याचा अर्थ भुसावळ विभागातील सुमारे २३ टक्के प्रवासी प्रत्यक्षरीत्या स्टेशनच्या तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुक करतात. ७७ टक्के प्रवासी इंटरनेट ऑनलाइन मोडद्वारे तिकीट बुक करतात.

भुसावळ विभागाला कोचिंगमधून ६६.८९ कोटी महसूल मिळाला. जो दिलेल्या ६४.७० कोटींच्या उद्दिष्टापेक्षा ३.३८ टक्के अधिक आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर ५०.३५ कोटींपेक्षा ३२.८५ टक्के अधिक आहे.

माल विक्रीतून ५८.३८ कोटी, पार्किंगमधून १४ लाखांचे उत्पन्न मिळाले. जे उद्दिष्टापेक्षा ६१.३९ टक्के अधिक आणि गेल्या वर्षाच्या दहा लाखांपेक्षा ४०.०० टक्के अधिक आहे. भाडे नसलेला महसूल ४० लाख आहे. जो दिलेल्या ३३ लाखांच्या उद्दिष्टापेक्षा २१.२१ टक्के अधिक आणि ७.४३ लाखांच्या मागील वर्षीच्या तुलनेत ४३८ टक्के अधिक आहे.

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

खानपानातून ६२ लाखांचा महसूल

रेल्वेच्या खानपान विभागातर्फे प्रवाशांना भोजन, शीतपेय व इतर वस्तू पुरविल्या जातात. त्यात विक्रीतून ६२ लाखांचा महसूल मिळाला आहे. जो ५० लाखांच्या उद्दिष्टापेक्षा २४ टक्के जास्त आणि गेल्या वर्षी ४० लाखांपेक्षा ५५ टक्के जास्त आहे.

भुसावळ स्थानकावर रेल्वे कोच रेस्टॉरंटची कमाईची निविदा पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक ५१ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न मिळेल, या हिशोबाने दिली आहे. नाशिक, अकोला आणि बडनेरा स्थानकांवर बीओटी तत्त्वावर नवीन शौचालये कॉम्प्लेक्स बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे.

"रेल्वेने नोव्हेंबर महिन्यात १३५ कोटी ३६ लाखांची कमाई केली आहे. जी गेल्या वर्षीच्या १२० कोटींपेक्षा १२.८० टक्के जास्त आहे. रेल्वे प्रवासी खिडकीवर जाऊन आरक्षणाऐवजी ऑनलाइन बुकिंगला पसंती देत आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे."

-डॉ. शिवराज मानसपुरे, सीनिअर डीसीएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT