theft esakal
जळगाव

जळगाव : 3 गावांत चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री 9 घरफोड्या

या प्रकारांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव (जि. जळगाव) : येथून जवळच असलेल्या वझरखेडे, पिंपळगाव बुद्रुक व तळवेल येथे सोमवारी (ता. ६ ) मध्यरात्री चोरट्यांनी नऊ ठिकाणी घडफोडी करून सहा लाख सात हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरांविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री तळवेल येथे दोन, पिंपळगाव बुद्रुक येथे पाच व ओझरखेडे येथील चार घरफोड्या केल्या. यामध्ये रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. घरफोडी झालेल्या घरातील कुटुंब गच्चीवर झोपले होते. पिंपळगाव बुद्रुक येथे आत्माराम कडू पाटील, रमेश लक्ष्मण पाटील, आनंदा सीताराम सरोदे, मधुकर सरोदे, वझरखेडे यांच्या घरांचे कुलूप तोडले. मात्र चोरांचा प्रयत्न फसला तर अशोक चावदस नेमाडे, गोकुळ तुकाराम नेमाडे व उमराव पाटील यापैकी नचिकेत नेमाडे यांच्या घरातून ४ लाख ७५ हजार रुपयांचा रोख रकमेसह ऐवज लंपास केला. तर तळवेल येथेही दोन ठिकाणी घरफोडी झाल्या. घटनेची माहिती वरणगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवुऊन तपासाला गती दिली आहे.

श्वानपथकास पाचारण

तीन गावांमध्ये एकाच रात्री चोरीच्या घटना उघड झाल्याने चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी वरणगाव पोलिसांनी जळगाव येथील श्वान चॅम्प पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. तर श्वान घरफोडी झालेल्या घराजवळच घुटमळल्याने चोरटे हे दुचाकी व कारने आले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन बोरसे , पोलिस कर्मचारी विनोद चव्हाण, भेसराव राठोड तसेच ठसे तज्ज्ञ जिल्ह्याचे अंगोली मुद्रा पथक सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत कांबळे, पोलिस कर्मचारी प्री ग्रुपचे फोटोग्राफर सचिन चौधरी, सहाय्यक फौजदार प्रकाश बारी, विनायक पाटील यांनी ठसे घेतले.

पोलिसांची दोन पथके रवाना

मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कृणाल सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ व पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, नागेंद्र तायडे, राहुल येवले, प्रशांत ठाकूर यांना तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT