Akhil-Bhartiy-Marathi-Sahitya Sammelan esakal
जळगाव

Marathi Sahitya Sammelan : अमळनेरात तब्बल 72 वर्षांनी भरणार साहित्याचा मेळा!

मराठी वाङमय मंडळासह साहित्यप्रेमी संमेलनाचे ‘शिवधनुष्य’ पेलण्यासाठी सज्ज

उमेश काटे

97th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लिलाताईंची क्रांतिभूमी, संत सखाराम महाराजांची अध्यात्मभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी, प्रताप शेठजींची दातृत्व भूमी, शिक्षणाची ज्ञानभूमी, अजीम प्रेमजींची उद्योगभूमी अशी नानाविध प्रकारची ओळख असलेल्या अमळनेरात तब्बल ७२ वर्षांनी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.

यापूर्वी अमळनेरला १९५२ मध्ये मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. हे मराठी साहित्य संमेलन अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी स्मरणात आहे. प्रख्यात समीक्षक (स्व.) कृ. पां. कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी होते.

अत्रे -फडके वादाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन यशस्वीपणे पार पडले होते. आता येथील मराठी वाङमय मंडळासह साहित्यप्रेमी हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ‘शिवधनुष्य’ पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत. (97th akhil bhartiya marathi sahitya sammelan will held in Amalner after 72 years jalgaon news)

अमळनेरच्या मराठी वाङमय मंडळ या संस्थेने यासाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. संस्थेचा नावलौकिक आणि प्रदीर्घ अनुभव ही एक जमेची बाजू लक्षात घेऊन संमेलनाची जबाबदारी मिळाली आहे.

अधिकृत घोषणा झाल्यानंतर शहरासह तालुक्यात मोठा साहित्यप्रेमींनी जल्लोष करण्यात आला. या वेळी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी,

संचालक प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्‍याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य रजनीताई आदींनी स्वागत केले आहे.

मराठी वाड्मय मंडळाची वाटचाल

अमळनेरमध्ये जुलै १९५१ मध्ये मराठी साहित्य प्रेमींनी एकत्र येऊन मराठी वाङ्ममय मंडळ ही संस्था सुरू केली. साने गुरुजींच्या अमळनेरात साहित्य संमेलन भरवावे, या उद्देशाने या संस्थेची निर्मिती झाली. १९६० ते १९८१ या काळात प्रा. मो. द. ब्रह्मे संस्थेचे कार्यवाह होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांनी म. वा. मंडळाची नोंदणी करून रजिस्टर केली. या म. वा. मंडळाचे पहिले अध्यक्ष म. गो. भालेराव होते. कार्यवाह प्रा. म. वी. फाटक, खजिनदार व. त्र्य. सोनाळकर होते. कार्यकारिणी सदस्य म्हणून का. प्र. पुराणिक, रावसाहेब नांदेडकर, मो. द. ब्रह्मे, ल. के. कुळकर्णी, रा. का. कुळकर्णी, डॉ. प्र. रा.म्हसकर, छाया गुप्ते (लिमये) ही मंडळी होती. अशा प्रकारे ५ ऑगस्ट १९५१ पासून मंडळ सुरू झाले. मराठी वाड्मय मंडळाने ऑक्टोबर १९५२ मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन भरवले व ते यशस्वी केले.

"अमळनेर येथील १५० वर्षांपूर्वीची व्हिक्टोरिया लायब्ररीमुळे साहित्य, शिक्षण, उद्योग, इतिहास, धार्मिकतेचे तोरण अमळनेर शहराला बांधलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अमळनेरचा आगळा वेगळा ठसा आहे. १९५२ ला अमळनेरात साहित्य संमेलन भरले होते. त्यानंतर पुन्हा अमळनेरला मराठी वाड्मय मंडळला यजमानपद मिळाले आहे. इतर संस्था व लोकसहभागातून आगामी साहित्य संमेलन दर्जेदार व यशस्वीरीत्या सक्षमपणे पार पाडू."

- डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर

"अनेक दिवसांपासून मनात असलेल्या साहित्यिक क्षेत्रात मानाचे पान मानले जाणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर नगरीत होत असल्याचा आनंद होत आहे. २०१४ सालापासून आपण महामंडळाला प्रस्ताव सादर करीत होतो. या प्रस्तावाचा विचार करून महामंडळाच्या स्थळ निवड समिती सदस्यांना अमळनेरातील विशेष स्थान माहात्म्य, व्यक्तिमाहात्म्य या सगळ्यांची दाखवणूक करून समिती सदस्यांचे समाधान कसं होईल, यासाठी प्रयत्न केले. आता आगामी संमेलनही एकदिलाने व एकजुटीने यशस्वी करून दाखवू."

- संदीप घोरपडे, कार्यकारिणी सदस्य, मराठी वाड्मय मंडळ,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT