Death by drowning in a well esakal
जळगाव

जळगाव : कबुतर पकडण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कबूतर पकडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या करण ऊर्फ कालू चुडामण भिल (पवार) (२४, रा. शेळगाव, ता. जळगाव) या तरुणाचा पाय घसरून सुमारे दीडशे ते दोनशे फूट विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शेळगाव शिवारात घडली. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाय निसटल्याने तरूण पडला विहिरीत

शेळगाव येथे करण ऊर्फ कालू हा तरूण शनिवारी (ता.९) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. सोबत भाचा तापीराम दामू भील आणि पुतण्या सम्राट गोरख भिल होते. विहिरीत कबुतरांचे घरटे असल्याने त्यांना पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत होता. दरम्यान त्याचा पाय निसटल्याने २०० फुट खोल विहिरीतील पाण्यात बुडू लागला.

गावकऱ्यांसह पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव

करण विहिरी पडताच पुतण्या सम्राटने घरी जात काका विहिरीत पडल्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पोलिस पाटील विलास पाटील गावकऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परंतु तो पर्यंत करणचा मृतदेह गाळात रुतून गेला होता.

दुसऱ्या दिवशी काढला मृतदेह बाहेर

घटनेची माहिती मिळताच नशिराबादचे पोलिस कर्मचारी यांनी धाव घेतली. विहिरीत प्रचंड गाळ असल्याने सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नाही. रविवारी गावकऱ्यांच्या मदतीने दुपारी बाराला मृतदेह बाहेर काढण्यात आला. उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, राजेंद्र ठाकरे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

SCROLL FOR NEXT