dam  esakal
जळगाव

Jalgaon News : हतनूर, वाघूर, गिरणा प्रकल्पांतील साठ्यात वाढ; धरणे भरली 100 टक्के

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दमदार पावसास सुरवात झाली आहे. मध्य प्रदेश, विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर (ता. भुसावळ) धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.

धरणाच्या कॅटमेंट एरियात पावसामुळे धरणातील साठा वाढून धरणाचे चार गेट अर्धा मीटरने उघडले आहेत. मध्यम प्रकल्पातील अभोरा, मंगरूळ, सुकी धरणे शंभर टक्के भरली. अग्नावती, भोकरबारी, बारी धरणात ठणठणाट आहे. (Abhora Mangrul Suki dams are 100 percent water storage jalgaon news)

२५ व २६ जूनला काहीसा पाऊस झाला. नंतर पावसाने दडी मारली. मात्र, ६ जुलैपासून शहरासह जिल्ह्यांत काही भागात दमदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसाअभावी निराश झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत.

‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा मे महिना अतिशय कडक उन्हाचा गेला. एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता. तेव्हाच ‘अल निनो’ इफेक्टमुळे यंदा पाऊस उशिराने येईल, असा इशारा दिला होता. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने जुलै-आगस्टपर्यंत पाणीटंचाईचे नियोजन केले होते. जून महिन्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले.

नंतर ‘बिपरजॉय’ वादळामुळे मान्सूनची पुढील वाट अडली. काही दिवसांपूर्वी वादळ शांत झाल्याने मान्सून पुढील वाटचाल करू लागला आहे. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबईला चांगला पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून रोज पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे नद्या, नाल्यांना पाणी येऊ लागले आहे. मोठ्या धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आणखी दोन ते तीन वेळा दमदार पावसाने हजेरी लावल्यास पाणीटंचाईचे काहीसे संकटे टळेल. सोबतच शेतकऱ्यांच्या पेरण्यांना वाढ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

धरणातील जलसाठा असा

धरण--आजचा जलसाठा--मागील वर्षीचा साठा (२०२२)

हतनूर--३८.४३ टक्के--१८.१२ टक्के

गिरणा--२०.५५--३३.६३

वाघूर--५६.५२--६१.८१

अभोरा--१००--५५.६३

मंगरूळ--१००--४०.०७

सुकी--१००--७४.५६

मोर--७१.४८--५५.६८

अग्नावती--०.००-०.००

हिवरा--०.००--०.००

बहुळा--१५.११--२४.२०

तोंडापूर--३१.७०--४३.०२

अंजनी--११.३५--२४.६१

गूळ--६२.८१--३६.७०

भोकरबारी--०.००--१३.२६

बोरी--०.००--४.९५

मन्याड--५.४४--१३.८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT