esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गोड बोलत सहा वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग, आईने आरडाओरड करताच..

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगिक वसाहत परिसराशेजारील सुप्रिम कॉलनी भागात एका विवाहासमारंभात आईसोबत आलेली सहा वर्षीय चिमुरडी मंडपात खेळत असताना पंचवीस वर्षीय भामट्याने तिला गोड बोलत शेजारील एका खोलीत नेत अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडला.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Abuse of six year old girl by 25 year old man jalgaon crime news)

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नातील गर्दीत आई व्यस्त असताना नराधमाने बालिकेला आमिष देत बाजूला नेले. शेजारील घराच्या एका खोलीत नेत तो पिडीतेवर अत्याचार करत असतानाच पिडिता किंचाळली.

नेमके त्याच वेळेस मुलगी दिसत नाही म्हणून तिची आई शोध घेत असताना त्या खोलीजवळ आली. तिने दार ठोठावत आरडाओरड केल्यावर पिडीतेला सोडून भामटा पसार झाला. घटनास्थळावर गर्दी झाली, एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली.

सहा वर्षीय बालिकेसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कळताच पिडीतेचे नातेवाईक कुटुंबीयांसह परिसरातील रहिवासी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकत्र आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यापूर्वीच कथित समाजसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थीचाही प्रयत्न केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्यात वाद नको म्हणत पिडीतेच्या पालकांवर दबाव आणला जात असताना यापूर्वी असाच प्रकार घडलेल्या दुसऱ्या एका पिडीतेचे पालकही पोलिस ठाण्यात धडकले. आमच्याही मुलीसोबत अर्शद नावाच्या भामट्याने गैरप्रकार केल्याची त्यांनी माहिती दिली.

पिडीतेच्या आईने पोलिसांना घटना सांगितली. अर्शद ऊर्फ अरबाज पटेल ऊर्फ बच्चन (२५, रा. सुप्रिम कॉलनी) या संशयितांची माहिती देताच सहाय्यक ‌फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक अल्ताफ पठाण, सुधीर साळवे, राहुल रगडे, इम्रान सय्यद, सुधीर साळवे यांनी संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने ओळखले.

पळून गेलेल्या मार्गाने त्याचा शोध घेत असताना जळगाव औरंगाबाद रस्त्यावर वाहनाला थांबवून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्शदने यापूर्वीही दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हाही मुलीच्या पालकांचा हातापाया पडत माफी मागून प्रकरण दाबण्यात आल्याची माहिती त्या पिडीतांच्या नातेवाइकांनी पोलिसांना देत, त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT