ABVP given statement to State CET Cell that colleges should be extended for few days to fill up vacancies jalgaon news esakal
जळगाव

Medical Courses Admission: प्रवेश मुदतवाढीसाठी ‘अभाविप’चे ‘सीईटी सेल’ला साकडे; बीएएमएस, बीएचएमएसचा प्रवेश घोळ

सकाळ वृत्तसेवा

Medical Courses Admission : वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमाच्या ‘ग्रुप बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस प्रवेशप्रक्रियेची अंतिम तारीख उलटून गेली असली, तरी या शाखांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महाविद्यालयांना काही दिवस मुदतवाढ द्यावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्याच्या ‘सीईटी सेल’ला दिले आहेत.

ही प्रक्रिया ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत ‘एनसीआयएसएम’ ही यंत्रणा राबवीत असून त्यांच्या निर्देशाशिवाय ‘सीईटी सेल’ त्यासंबंधी अधिसूचना काढू शकत नसल्याने अभाविपतर्फे ‘आयुष’च्या यंत्रणेला निवेदन देण्यात येणार आहे.

ज्या नवीन महाविद्यालयांना ‘एनसीआयएसएम’ने मान्यता दिली आहे, त्यांचाही प्रवेशप्रक्रिया राबविण्याची संधी मिळावी म्हणून न्यायालयीन लढा सुरु असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (ABVP given statement to State CET Cell that colleges should be extended for few days to fill up vacancies jalgaon news)

‘आयुष’ मंत्रालयांतर्गत ‘एनसीआयएसएम’च्या निर्देशानुसार महाराष्ट्रात ‘सीईटी सेल’ने वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमाच्या विविध शाखांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली. ‘ग्रुप ए’मधील एमबीबीएस व बीडीएसची प्रवेश प्रक्रिया सर्वांत अगोदर संपली. ‘ग्रुप बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस शाखांच्या प्रक्रियेसाठी ३० नोव्हेंबर ही ‘कट ऑफ डेट’ होती. नोव्हेंबरमध्ये ‘एनसीआयएसएम’ने काही महाविद्यालयांना मान्यता दिली.

त्यात जवळपास अकरा आयुर्वेद महाविद्यालये केवळ ‘स्ट्रे व्हॅकन्सी राउंड’च्या वेळी या प्रक्रियेत आल्याने त्यांच्या जागा रिक्त राहिल्या. नोव्हेंबरच्या शेवटी आणखी सहा आयुर्वेद महाविद्यालयांना ‘एनसीआयएसएम’ने ‘एलओपी’ (लेटर ऑफ परमिशन) दिले. मात्र, ही महाविद्यालये ‘कट ऑफ डेट’ निघून गेल्याने प्रवेशप्रक्रिया राबवू शकले नाहीत.

त्यामुळे नव्या महाविद्यालयांमधील व अगोदरच्या महाविद्यालयांच्या दीडशे जागा अशा जवळपास पाचशे जागा अद्याप रिक्त आहेत. शिवाय राज्यात अजूनही आठ ते दहा हजार पात्र विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्यावी, यासाठी त्यांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. त्यावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात २ जानेवारीस सुनावणी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

‘सकाळ’ने प्रवेश प्रक्रियेतील घोळ वृत्तांमधून मांडला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वृत्तमालिकेची दखल घेऊन ‘सकाळ’कडून माहिती जाणून घेत ही संघटना लढ्यात उतरली. ‘अभाविप’च्या प्रदेश शाखेने विद्यार्थ्यांच्या हिताची मागणी करीत महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ‘सीईटी सेल’कडे केली आहे.

निवेदनावर ‘अभाविप’च्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे महामंत्री अनिल ठोंबरे, विदर्भ प्रांताचे महामंत्री पायल किनके, देवगिरीच्या वैभवी धिवरे, व कोकण विभागाचे संकल्प फळदेसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुदतवाढीचे अधिकार ‘एनसीआयएसएम’ला असल्याने या यंत्रणेला निवेदन देण्यात येणार आहे.

‘स्पॉट राउंड’ला फाटा

‘एनसीआयएसएम’ व राज्याची यंत्रणा म्हणून ‘सीईटी सेल’ने या वेळी प्रवेश प्रक्रियेतील ‘स्पॉट राउंड’ला वगळले. मुळात, ‘सीईटी सेल’च्या माहितीपत्रकात या ‘राउंड’चा उल्लेख आहे. मात्र, हा ‘राउंड’ झाला नाही. ऑनलाइन ‘स्ट्रे व्हॅकन्सी राउंड’ झाल्यामुळे महाविद्यालय मिळूनही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. तीन ‘स्ट्रे व्हॅकन्सी राउंड’ होऊनही तीच स्थिती राहिली. त्यामुळे नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमधील बऱ्याच जागा रिक्त राहिल्या. विद्यार्थीही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT