Potholes and dangerous protection rocks on the bridge over the river Dhaadi in the city. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘धाडी’वरील खड्डेप्रश्‍नी फैजपूरकरांची वज्रमूठ; पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील धाडी नदीवरील पुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी वज्रमूठ केली असून पुलावरील खड्डे तत्काळ बुजवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, इशारा दिला आहे.(Accidents are happening due to large potholes on bridge over Dhaadi river jalgaon news)

शहरातून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावरील शहरातील धाडी नदीपात्रावर पुलाचे बांधकाम जवळपास पन्नास वर्षांपूर्वी झाले आहे. केळीच्या पट्ट्याचा भाग असल्याने या मार्गाने पुलावरून विविध राज्यामधील अवजड वाहनांची रात्र-दिवस वर्दळ सुरू असते.

त्याचप्रमाणे सावद्याकडे जाणाऱ्या मार्गालगत महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी व पादचारी यांची वर्दळ मोठी असते. अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी नेहमी छोटे-मोठे अपघात होत आहेत. या ठिकाणावरून पादचारी व वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते.

खड्डे वाचवून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे खड्डे वाचवून चालताना दुचाकी घसरून पडत असल्याने दररोज छोटे, मोठे अपघात या पुलावर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, धाडी नदी पुलावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. धाडी पुलालगतचे खड्डे बुजविण्यात आले. मात्र पुलावरील खड्डे बुजणे आवश्यक असताना का बुजविण्यात आले नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेला शहरातून गेलेला अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाचे राज्य महामार्गातून राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आला आहे, असे सांगितले जाते. मग या महामार्गावरील पुलावर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोणाची ?, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून केला जात असून संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्‍नाकडे लक्ष घालून खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे.

सुभाष चौकातील खड्डा ‘जैसे थे’

शहरातील गजबजलेल्या सुभाष चौकालगत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील प्रमुख दर्शनी ठिकाणी असलेला खड्ड्यांची दोनवेळा दुरुस्ती करून सुद्धा काही उपयोग झाला नाही. हा खड्डा पुन्हा उखडल्याने धोकादायक ठरत असल्याने रहदारीसाठी मोठा त्रासदायक ठरत आहे.

संरक्षण कठड्यांची दुरवस्था

फैजपूर शहराकडून सावद्याकडे जाणाऱ्या धाडी नदीवरील पुलाच्या संरक्षण कठड्यांची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या संरक्षण कठड्यांची सुरक्षित वाहतुकीच्यादृष्टीने तातडीने दुरुस्ती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT