Jalgaon: Municipal Corporation employees removing encroachments in Valmiknagar esakal
जळगाव

Municipal Corporation Update : शहरातील रस्त्यांची कामे सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरणाचे मक्तेदारांना आदेश दिले आहेत. वाल्मीकनगर भागातील रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

या रस्त्यावरील अतिक्रमण शुक्रवारी (ता. २०) काढण्यात आले, तर सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याचे कामही शनिवार (ता. २१)पासून सुरू होणार असून, या रस्त्यावरील अतिक्रमणही काढण्यात येणार आहे.

वाल्मीकनगर भागातील असोदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे आदेश दिले आहेत. अनेक भागांत त्याची कामेही सुरू झाली आहेत. जळगावकडून असोद्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचाही मक्ता देण्यात आला आहे. (Action by Municipal Corporation on encroachment Road works in city are underway Jalgaon News )

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

मक्तेदाराने कामही सुरू करण्याची तयारी केली आहे. यासाठी या रस्त्यावर खडीही टाकली आहे. मात्र, या रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कामात अडथळा येत असल्यामुळे प्रथम अतिक्रमण काढण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. त्यानुसार शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली. दिवसभरात या रस्त्यावरील तब्बल ३५ टपऱ्या हटविण्यात आल्या. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे संजय ठाकूर, श्री. नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

भंगार बाजार न भरविण्याचे आदेश

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर शनिवारी साप्ताहिक भंगार बाजार भरतो. महापालिकेने भंगार बाजार रस्त्यावर न भरविण्याचे आदेश दिले आहेत. सकाळपासून पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. ते काम आता सुरू होत आहे. याशिवाय पद्मालय विश्रामगृहासमोरील रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. या ठिकाणीही मक्तेदाराने कामासाठी खडी टाकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT