Jalgaon News : शहरात अनधिकृत जाहिरात फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. त्यावर महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागातर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे. (Action by Retail Recovery Department of Municipal Corporation for putting up unauthorized advertisement boards jalgaon news)
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक लावल्यामुळे विद्रुपीकरण होत आहे. त्याबाबत नागरिकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग, फलकांवर कारवाई करण्यासाठी महिन्यातून दोन वेळा मोहीम राबविण्याची सूचना केल्या आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या अनुषंगाने महापालिका उपायुक्त गणेश चाटे यांच्या सूचनेनुसार बुधवारी (ता. २६) शहरातील विविध भागांतील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात दिवसभरात एक हजार १५० बॅनर्स व २३ झेंडे काढून जप्त करण्यात आले आहेत. तसेच यापुढेही अशा स्वरूपाची कारवाई सुरूच राहणार असून, महापालिकेची परवानगी न घेता बॅनर्स व होर्डिंग लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.