Adhik Maas 2023  esakal
जळगाव

Adhik Maas 2023: ‘धोंड्याचा महिना’ उद्यापासून! जावाईबापूंना सासरच्यांनी बोलावणे धाडले

सकाळ वृत्तसेवा

Adhik Maas 2023 : ‘धोंड्याचा महिना’ अर्थात अधिक श्रावणमास १८ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान आहे. अधिक श्रावणमासानंतर १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान निज श्रावणमासचे आगमन होणार आहे.

या कालावधीत श्रावणाचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी, असे सण, उत्सव आणि व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रवणमासातच करायची असतात, अशी माहिती जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी दिली. (Adhik Maas 2023 Month of dhonda from tomorrow jalgaon)

धोंड्याच्या महिन्यात दानाचे अधिक महत्त्व आहे. जावायांना धोंड्याचे वाण घेण्यासाठी सासरी बोलविल्याचे चित्र आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा ‘धोंड्याचा महिना’ म्हटले जाते. तब्बल तीन वर्षांनी यंदा अधिक श्रावणमास आला आहे.

पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी नियमावली आहे. सूर्य मीन राशीत असताना, चांद्र महिन्याला प्रारंभ होतो. कधी कधी एका राशीत सूर्य असताना, दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो.

त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो. यंदा रविवारी (ता. १६) उत्तररात्री ५-०६ मिनिटांनी सूर्याने कर्क राशीत प्रवेश केला.

१७ ऑगस्टला दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. या काळात दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होईल. त्यामुळे अधिक श्रावण आणि निज श्रावण, अशी दोन नावे देण्यात आली आहेत.

ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही, तो अधिक महिना धरला जातो. या वर्षी १८ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान सूर्याचा राशी बदल झालेला नाही. त्यामुळे श्रावण हा चांद्र महिना अधिकमास झाला आहे.

असा येतो अधिकमास ?

३० तिथीचा एक चांद्रमास होतो आणि १२ चांद्रमासाचे एक चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा ११ तिथीने लहान असते. दरवर्षी ११ तिथी शिल्लक राहिल्यानंतर ३० तिथी होतात, तेव्हा अधिकमास येतो. एकदा अधिकमास आल्यानंतर साधारणपणे साडेबत्तीस चांद्र महिन्यांनी पुन्हा अधिकमास येतो.

दोन अधिक मासांमध्ये कमीत कमी २७ महिने व जास्तीत जास्त ३५ महिने अंतर असते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रवण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व फाल्गुन या ९ महिन्यांपैकी कोणताही महिना अधिकमास येऊ शकतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काय करू नये ?

अधिक मासात शक्यतो शुभ कार्य करू नये. अधिक मासात देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी करू नयेत.

जावईबापूंच्या पाहुणचाराचे बेत

हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेत जावयाला ‘नारायणा’चे रूप मानले जाते. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचे रूप मानले जाते.

तीन वर्षांनंतर एकदा येणारा अधिक मास जावई मंडळींसाठी पर्वणीच असतो. यानिमित्त जावयाच्या पाहुणचाराचे बेत आखले जात आहेत. तुपातील ३३ अनारशाचे वाण, चांदी किंवा तांब्याच्या ताटात सजवून त्यात तुपाचा दिवा लावून जावयाला देण्याची परपंरा आजही अनेक ठिकाणी कायम आहे.

अनारशांऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, जाळीदार पदार्थही दिले जातात. त्यांची संख्या ३३ असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे, अशा वस्तू ३३ पटीत दान केल्या जातात.

अधिकमासात काय करावे ?

*संपूर्ण दिवस उपवास करावा

*देवापुढे अखंड दीप लावावा

*अनरसेंचे दान करावे

*३३ अनरसे विष्णूला अर्पण करावीत

*जावयाला ३३ अनरशांचे दान द्यावे

*दान करावे, ते गुप्त ठेवावे

"मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी जसे आहार, उपवास किंवा व्रत केले जातात. मानसिक शांतीसाठी चांगल्या कर्मासाठी गुपित दान करणे, ऋतूनुसार आहार बदलावा. जेणेकरून आरोग्य चांगले राहील. श्रीविष्णूच्या नामाचा अधिकाधिक जप करावा. दानाला अधिक महत्व आहे." -मंगेश महाराज जोशी, गादीपती, श्रीराम मंदिर संस्थान, जुने जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT