Caste Certificate esakal
जळगाव

Caste Certificate : आदिवासी टोकरेकोळी जातप्रमाणपत्र मिळणार सुलभ पद्धतीने!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील प्रांत कार्यालयासमोर ८ मेपासून आदिवासी टोकरे कोळी जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी समाजबांधवांसह तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. (Adivasi Tokare Koli caste certificate can be obtained in an easy way jalgaon news)

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या दिवशी याबाबत दखल घेतली. या वेळी उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी आजअखेर जेवढे प्रलंबित प्रकरणे असतील त्यांना टोकरे कोळी जातीचा दाखला देण्यास सुरुवात केली. यामुळे अमळनेर व चोपडा तालुक्यातील शेकडो समाजबांधवांना टोकरे कोळीचे (एसटी) दाखले मिळणार आहेत.

हे उपोषण पाचव्या दिवशी प्रांताधिकारी कडलक यांच्याहस्ते अन्नत्याग सत्याग्रहकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी नायब तहसीलदार अमोल पाटील, ॲड. गणेश सोनवणे, माजी पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, बाळासाहेब सैंदाणे, योगेश बाविस्कर, नामदेव येळवे,

गोपाळराव सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश खन्ना, गुलाबराव बाविस्कर, प्रल्हाद कोळी, लखीचंद बाविस्कर, हिलाल सैंदाणे, सुखदेव कोळी, रामचंद्र सपकाळे, कैलास सोनवणे, गोविंदा कोळी, एस. कुमार पेंटर, गोपाळ बाविस्कर, विठ्ठल कोळी आदींसह तालुका व जिल्हा व बाहेरील समाजबांधव, पदाधिकारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT