Customers giving Rs 2000 note after filling petrol at petrol pump and Citizens exchanging Rs 2000 notes at the main branch of State Bank.  esakal
जळगाव

2000 Rupees Note Exchange : सराफांच्या ‘दारी’ अन्‌ ‘बँकांतही’ 2 हजारांच्या नोटा; सोन्याच्या विक्रीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दोन हजारांची नोट व्यवहारातून बंद करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर सोन्या-चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नागरिक घरातील दोन हजारांचा नोटा घेऊन थेट सराफी दुकानातून सोने विकत घेताना दिसत आहेत. (After Reserve Bank announced that it will stop 2000 note from circulation demand for gold and silver increased jalgaon news)

मंगळवार (ता. २३)पासून बँकांत दोन हजारांच्या नोटा बदलवून मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. नागरिकांनी स्टेट बँकेत नोटा बदलवून मिळण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. तब्बल चार कोटींच्या नोटा बदलवून दिल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

नोटबंदीच्या काळात अनेक व्यापाऱ्यांनी जुन्या नोटांच्या बदल्यात सोन्याची खरेदी वाढवली होती. त्यामुळे सोने व्यापारी प्राप्तिकर आणि इतर विभागाच्या रडारवर आले होते. अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. ही अडचण लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी ५० हजार रुपयांच्या खरेदीपर्यंत कोणतीही अट लादलेली नाही. मात्र, त्यापेक्षा अधिक सोने खरेदीसाठी पॅनकार्डची अट घातली आहे.

सोने विक्री वाढली

सोन्याचा दर मंगळवारी प्रतितोळा ६० हजार ८०० (विना जीएसटी) होता. दोन हजाराच्या रुपयांच्या नोटांसह सोने किंवा चांदी खरेदी करण्याबाबत अनेक चौकशी होत आहेत. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. ५० हजार रुपयांच्या खरेदीपर्यंत पॅनकार्डची गरज नाही. मात्र, त्यापेक्षा अधिकच्या खरेदीला पॅनकार्डची सक्ती असल्याने अनेकांनी विविध मार्गांनी सोने खरेदीचा फंडा काढला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोन्यात गुंतवणूक

नागरिकांकडून सोने खरेदी वाढण्याचे कारण म्हणजे नागरिकांचा चलनावरील कमी झाला विश्वास आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार आता पर्यायी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करीत आहेत. त्यातूनच दोन हजारांच्या नोटांबाबत घेतलेल्या निर्णयावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सोन्यात गुंतवणूक फायदेशीर असल्याने त्याकडे अधिकच्या नोटा असलेल्या गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेतून दोन हजारांच्या नोटा बदलवून मिळेल. सोबतच आपल्या खात्यातही त्या जमा करता येणार आहे.

बँक, पोस्टात गर्दी वाढली

शहरातील स्टेट बँकेत मंगळवारी सकाळपासूनच दोन हजारांच्या नोटा बदलण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. २० हजारांपर्यंतच्या नोटा बदलवून मिळत आहेत. असे असले तरी बँकेच्या खात्यात नोटांचे बंधन नाही.

अनेक नागरिक आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये दोन हजारांच्या नोटा जमा करताना दिसले. टपाल खात्यातही नागरिकांची या नोटा भरण्यासाठी गर्दी वाढली आहे. ज्यांचे टपाल विभागात अकाउंट आहे. त्यांना त्याच्या खात्यात दोन हजारांच्या नोटा भरता येत आहेत.

पेट्रोलपंपांवर २ हजारांची नोटा वाढल्या

आतापर्यंत पेट्रोलपंपांवर दोन हजार रुपयांची नोट देऊन पेट्रोल भरणाऱ्यांची संख्या फार कमी होती. मात्र, त्या नोटा बंद होणार असल्याचे जाहीर होताच पेट्रोल भरण्यासाठी दोन हजारांच्या नोटा घेऊन येणारे ग्राहक वाढले आहेत, असे पेट्रोलपंपाच्या चालकांनी सांगितले. मात्र, ग्राहकांना एकावेळी पाचशे रुपयांचे पेट्रोल भरण्याची अट टाकली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT