Jalgaon News : कुरंग हरिण कुळातील प्रमुख हरिण म्हणजे काळवीट (नर) दोन काळवीट एकत्र आले. त्यांच्यामध्ये आपसातील द्वंद्व होते. आणि जोपर्यंत एक किंवा दोन्ही मृत होत नाही, तोपर्यंत ते युद्ध चालते अशीच काळवीटांची झुंज बोरखेडा शेतीशिवारातील एका शेतात झाली.
मात्र शेतकरी आणि वनविभागाच्या सतर्कतेने दोघांचा जीव वाचला तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Agricultural loss due to antelope attacks jalgaon news)
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोरखेडा शेतीशिवारातील शालिग्राम परशुराम पिंगळे (रा.बोरखेडा जुने, ता.मुक्ताईनगर) यांच्या गट नंबर ११६ मधील शेतात बागायती कपाशी असून, ते नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता. ५)सकाळी शेतात गेले असता त्यांना कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान दिसले आणि पुढे गेल्यावर दोन काळवीट ठिंबक नळ्यामध्ये पूर्णपणे अडकून फसलेले दिसले.
त्यांनी तत्काळ वढोदा वनविभागाच्या कार्यालयाला माहिती दिली. माहिती समजताच प्रभारी वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भावना मराठे, वनरक्षक अक्षय मोरे, वनमजूर योगेश बोरसे घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांची मदत घेऊन दोन्ही काळवीटांच्या गळ्यातील अडकलेला ठिंबक नळ्यांचा फास काढून पुन्हा त्यांनी छलांग घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेले.
शेतकरी आणि वन विभागाच्या सतर्कतेने वाचले दोघांचा जीव वन्य प्राण्यांचे काही नियम असतात.
कुरंग हरीण कुळातील प्रमुख असलेले काळवीट (नर) यांच्या एका कळपात दोन काळवीट एकत्र राहू शकत नाही. त्यामुळेच त्यांच्यात आपसी कडवी झुंज होते. हे युद्ध एवढे भयंकर होते की दोघातील एकाचा जीव किंवा दोघेही मृत होतात, तोपर्यंत चालते.
मात्र सदर काळवीट हे ठिंबक नळ्यांच्या संचाला पूर्णपणे गुडांळले गेल्यामुळे त्यांची हालचाल बंद झाली आणि सकाळी शेतकरी शालिग्राम पिंगळे शेतात गेल्यामुळे त्यांना दिसले. त्यांनी लागलीच वन विभागाला कळविले. घटनास्थळी वन विभाग तत्काळ दाखल झाल्याने दोघांचे जीव वाचला यावेळेस दिनकर ढगे, किशोर पिंगळे, संतोष पिंगळे या शेतकऱ्यांनी सहकार्य केले.
नुकसान भरपाईची मागणी
दोन काळवीटांच्या झुंजीत शतकरी शालिग्राम पिंगळे यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी पिकासह ठिंबक नळ्यांचे नुकसान झाले असून, वन विभागाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.