Police, officers and employees of Agriculture Department while seizing stock from Sanjay Beldar's house.  esakal
जळगाव

Jalgoan News : बेकादेशीर कृषी संजीवकांचा कथित कारखाना सील; गुन्हे शाखेसह डीवायएसपी पथकाचा छापा

सकाळ वृत्तसेवा

Jalgoan News : निमखेडी शिवाराच्या धनश्रीनगरमधील बोगस कृषी संजीवके (प्लांट ग्रोथ हार्मोन्स) तयार करण्याच्या कारखान्यावर शनिवारी (ता. २२) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी कारखान्यातून दोन लाख चार हजारांच्या तयार मालासह कच्चे रसायन आणि इतर साहित्य जप्त करून एकाला अटक केली. (Alleged Factory Seals of Illegal plant growth hormone jalgaon news)

निमखेडी शिवारातील धनश्रीनगरात संजय संतोष बेलदार (मूळ रा. चुंचाळे, ता. चोपडा, ह. मु. धनश्रीनगर) कुठलाही पास परवाना नसताना केळी व कपाशी पिकांवर फवारणीसाठी संजीवके तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांना मिळाली.

त्यांच्यासह पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या विशेष पथकाने शनिवारी (ता. २२) सायंकाळी तेथे छापा टाकला. संजय बेलदार कृषी संजीवके तयार करताना आढळले. त्यांच्याजवळ बीटी स्पेशल ५०० च्या २८० बॉटल, २५० एमएलच्या ४० बॉटल, कृषी ह्यूमन्स संजीवक कंपनीचे ५०० एमएलचे २० नग, १०० एमएलचे ८० नग, ५ लिटरच्या १८ कॅन्स, तर २० लिटरच्या २ कॅन्स, असा एकूण ३९० लिटर साधारण दोन लाख चार हजार रुपयांचा साठा मिळून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कृषी अधिकारी विकास बोरसे (जिल्हा गुणनियंत्रक), विजय पवार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार अनिल जाधव, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, दर्शन ढाकणे यांनी परवान्याची मागणी केल्यावर संजय बेलदार यांच्याकडे अधिकृत परवाना मिळून आला.

मात्र, औषध स्वतंत्र कंपनीत किंवा कारखान्यात तयार करणे कायद्याने बंधनकारक असताना, बेलदार औषध राहत्या घरात तयार करताना आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पथकाने सांगितले.

बीटीचा परवाना नाही

बीटी स्पेशल संजीवकाचा कोणताही परवाना नसताना संजय बेलदार ते तयार करताना आढळून आले. कृषी विभागाने पंचनामे करून नमुने संकलित करून माल ताब्यात घेतला आहे. उर्वरित कारवाई जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत होणार असल्याचे जिल्‍हा पोलिस दलाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

SCROLL FOR NEXT