students leaving city for job esakal
जळगाव

Job Migration : दर वर्षी 2 हजार अभियंत्यांचे नोकरीसाठी स्थलांतर!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नाहीत. भविष्यात त्या उपलब्ध होण्याची शक्यताही नाही. परिणामी, जळगाव जिल्ह्यातून दर वर्षी अभियांत्रिकीची (Engineering) डिग्री घेणारे जवळपास दोन हजारांवर विद्यार्थी नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होताय.

इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षणासाठीही जवळपास ६० टक्के विद्यार्थी जळगाव सोडून जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलेय. (Almost 60 percent of students are leaving city for higher education after class 12th jalgaon news)

दुर्दैवाने जळगाव जिल्ह्याच्या थांबलेल्या विकासावर आणि झालेल्या पीछेहाटीवर राजकीय नेते काही बोलायला तयार नाहीत अन्‌ प्रशासकीय यंत्रणाही त्याबाबत कमालीची उदासीन आहे.

गेल्या महिन्यात ‘जळगाव फर्स्ट’तर्फे शहरातील थांबलेला विकास आणि प्रगती या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक किरण बच्छाव यांनी जळगावातून होणाऱ्या ‘ब्रेन ड्रेन’ अर्थात नोकरी, शिक्षणासाठी होणाऱ्या स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला. त्या मुद्द्यावरून यासंदर्भात माहिती जाणून घेतली असता, त्यातून विदारक चित्र समोर आलेय.

दर वर्षी दोन हजारांवर अभियंते घेताय पदवी

जळगाव शहरातील पाच-सहा महाविद्यालयांसह जिल्ह्यात अभियांत्रिकीची आठ महाविद्यालये आहेत. दर वर्षी या महाविद्यालयांमधून मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, आयटी- कॉम्प्युटर, इन्स्ट्रुमेंटेशन अशा विविध शाखांमधून शिक्षण पूर्ण करून साधारणत: दोन हजार पदवीधर अभियंते बाहेर पडतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सर्वच नोकरीसाठी बाहेर

दोन हजार विद्यार्थी दर वर्षी अभियंते होत असून, यापैकी अवघे काहीच बोटावर मोजण्याइतके तरुण जळगावात नोकरी अथवा व्यवसायासाठी म्हणून थांबतात. बाकी सर्व तरुण-तरुणी नोकसासाठी पुणे, मुंबई, नाशिक अथवा राज्याबाहेरील शहरांमध्ये स्थलांतरित होतात.

उच्च शिक्षणासाठीही ‘मेट्रो’कडे

केवळ नोकरीच्या शोधातच नव्हे, तर उच्च शिक्षणासाठीही जळगाव सोडून पुणे, मुंबई अथवा राज्याबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी नाही. इयत्ता बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या तरुणांचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याचा दावा केला जातो.

विदेशातही ‘ब्रेन ड्रेन’ सुरू

गेल्या काही वर्षांत स्थानिक विद्यार्थ्यांचे मोठ्या महानगरांमध्येच नव्हे, तर विदेशातही स्थलांतर होतेय. पुणे, मुंबईत दोन-चार वर्षे नोकरी केल्यानंतर तरुणांना थेट विदेशातील कंपन्यांमधून ऑफर येते. त्यामुळे परदेशातही ‘ब्रेन ड्रेन’ सुरूच आहे.

...अशी आहेत कारणे

- मुळात जळगावसारख्या लहान महानगरात नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत

- जळगावातील एमआयडीसीत स्थानिक उच्चशिक्षितांना नोकरी देऊ शकतील असे जॉब नाहीत. असले तरी तेवढे वेतन ते देऊ शकत नाहीत

- आयटी व अन्य क्षेत्रातील कंपन्यांचे जाळे मेट्रो शहरांमध्येच आहे. त्यापैकी बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या असल्याने त्या छोट्या शहरांमध्ये येण्याचे कारणच नाही

- आपल्याकडे शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचा दावा केला जात असला तरी अभियांत्रिकीतील उच्च शिक्षणासाठी आपल्या

विद्यार्थ्यांचा कल अजूनही पुणे, मुंबई अथवा अन्य मोठ्या शहरांमधील नामांकित महाविद्यालयांकडेच कायम आहे.

"जळगाव जिल्ह्यातून दर वर्षी दोन हजारांवर पदवीधर अभियंते बाहेर पडतात. एक तर उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ते मोठ्या शहरांकडे वळतात. आपल्या जिल्ह्यात त्यांना रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे जळगावात उच्चशिक्षित कुणीही विद्यार्थी थांबायला तयार नाही." -प्रा. डॉ. जी. एम. माळवटकर, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

"अन्य शहरांप्रमाणेच जळगावातील महाविद्यालयांमध्येही आता चांगले व दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांमधून शिक्षण घेण्यासाठी जनजागृती करावी लागेल. नोकरीसाठी मात्र जळगावात काही भविष्य नाही." -प्रा. विजयकुमार पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT