Amalner Municipal Council esakal
जळगाव

घरकुल मंजूरीमध्ये अमळनेर नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत (Pradhan Mantri Awas Gharkul Yojana) नाशिक विभागात अमळनेर नगरपरिषदेचा (Amalner municipal council) पहिला क्रमांक आला आहे. नाशिक विभागातील ५० पेक्षा जास्त असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये सर्वाधिक वैयक्तिक घरकुले पूर्ण करणारी येथील नगरपालिका प्रथम ठरली आहे. पालिकेमार्फत मंजूर झालेली घरकुले व पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ही नाशिक विभागातील अन्य नगरपालिका व नगरपंचायतीच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. (Amalner Municipal Council first in Nashik division in gharkul approval Jalgaon News)

जे नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, जे झोपडपट्टीत राहतात, ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही अशांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत अमळनेर पालिकेच्या कार्यक्षेत्रात घटक क्रमांक चारमध्ये वैयक्तिक स्वरुपातील घर बांधणी घटकातील एकूण ७६० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ५८९ लाभार्थ्यांना पालिकेकडून बांधकामांची परवानगी देण्यात आलेली आहे. यातील ४८६ घरकूलांचे काम सध्या सुरू झाले आहे. यात ३१७ घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. बांधकाम सुरू असलेल्या उर्वरित घरकुलांचे कामे प्रगतीपथावर असून लवकरच ही घरकुले देखील पूर्ण होणार आहेत.

मेळाव्याद्वारे मार्गदर्शन

या योजनेच्या प्रभावी अंबलबजावणीसाठी पात्र लाभार्थ्यांचा वेळोवेळी मेळावा घेतला जातो. लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी मंजुरी सात दिवसात देण्यासाठी पालिका प्रयत्नशील असते, असे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. घरकुल बांधकामांचे विविध टप्प्यावरील कामे पूर्ण झाल्यानंतर अभियंत्यांमार्फत तत्काळ पाहणी करुन तांत्रिक बाबींची पूर्तता करून साधारणतः तीन ते चारच दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात केंद्र शासनाच्या ‘पीएफएमएस पोर्टल’द्वारे अनुदान वर्ग केले जाते. या योजनेच्या कामासाठी पालिकेत स्वतंत्र्य कक्ष उभारण्यात आला असून नगर अभियंता अमोल भामरे, उपनगर अभियंता डी. एस. वाघ व रचना सहाय्यक विकास बिरारी यांच्या देखरेखीखाली कामकाज सुरु आहे.

जानेवारी २०२२ मध्ये वैयक्तिक घरकुलांच्या २६० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाचे काम देखील सुरू झाले आहे. शहरात एकूण १ हजार २० घरकुले मंजूर झाली असून वैयक्तिक घरकुलांच्या प्रस्ताव मंजुरीतही अमळनेर पालिका विभागात अव्वल ठरली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रशासक तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदींचे मार्गदर्शन लाभल्याने विभागात पहिला येण्याचा मान अमळनेर पालिकेला मिळाला आहे.

"घरकुलांचे काम पूर्ण होण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे उर्वरित निधीची मागणी वेळोवेळी केली जात असल्याने या योजनेची सध्या प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल, त्यांनी लवकरात लवकर पालिकेशी संपर्क साधावा." - प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी : अमळनेर नगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT