अमळनेर (जि. जळगाव) : येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयाने महाराष्ट्रात नावलौकिक मिळविले असताना आता काळाची गरज लक्षात घेत एक पाऊल पुढे टाकले असून, या माध्यमातून ‘प्रताप पॅटर्न’ची (Pratap Pattern) मुहूर्तमेढ रोवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आयआयटी (IIT), अभियांत्रिकीला (Engineering) जायचे असो वा वैद्यकीयची (Medical) तयारी असो यासाठी कोटा- मुंबई- पुणे- लातूरच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. (Amalner Pratap pattern on Mumbai Pune model helpful for IIT medical Engineering Jalgaon Education News)
यासाठी प्रताप महाविद्यालयाने नामांकित क्वांटम इन्स्टिट्यूटला महाविद्यालयाशी जोडले असून, येत्या १ जुलै २०२२ पासून प्रताप महाविद्यालयात अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठीचे पूर्वतयारी वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. या प्रताप पॅटर्नची संपूर्ण माहिती देण्यासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा, संचालक डॉ. अनिल शिंदे, विनोद पाटील, नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, उपाध्यक्ष माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, चिटणीस प्रा. ए. बी. जैन, प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे व क्वांटम इन्स्टिट्यूट आयआयटी, जेईई मेडिकल फाउंडेशनचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष हरी वाणी यांनी सांगितले, की आपल्या परिसरातील गोरगरीब व गुणी विद्यार्थ्यांना आपल्या गावातच जेईई आणि ‘नीट’चे धडे घेण्यात यावे, यासाठी आम्ही प्रताप पॅटर्न सुरवात करीत आहोत.
संस्थेचे कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा म्हटले, की नीट, जेईईच्या तयारीसाठी आर्थिक सधन असलेले विद्यार्थी बाहेरगावी जातात. मात्र परिस्थिती नसलेले वंचित राहतात. त्यासाठीच क्वांटम इन्स्टिट्यूटसोबत आपण करार करून पुरेशी जागा आणि इन्फस्ट्रक्चर उपलब्ध करून दिले आहे.
संस्थेचे संचालक डॉ. अनिल शिंदे यांनी सांगितले, की इतरांपेक्षा या वेळी काही वेगळे करायची इच्छा असल्याने हा प्रयोग राबवित आहोत. प्रामुख्याने ग्रामीण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना या प्रवाहात आणण्याचा उद्देश आहे. कोटा सिस्टिमप्रमाणेच येथे शिक्षण मिळणार आहे.
संचालक नीरज अग्रवाल यांनी सांगितले, की मागील टर्ममध्ये आम्ही संस्थेत इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभी केली. महाविद्यालयात वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्स सुरू झाले आहेत.
क्वांटम इन्स्टिट्यूटचे संचालक पवन देसले यांनी सांगितले, की आम्ही या क्षेत्रात २०१४ पासून असून, बन्सलसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये वर्किंग केले आहे. आता ग्रामीण भागात काम करण्याचा मानस असून, दरवर्षी किमान ७ ते ८ विद्यार्थी नीट व जेईईसाठी देऊ शकतात, हा आमचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एच. निकुंभ, प्रा. डॉ. जे. बी. पटवर्धन, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. उल्हास मोरे व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.