Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कार्यकर्त्यांच्या गर्दीत भरली ‘चोरांची शाळा’

उमेश काटे

Jalgaon News : कोणताही राजकीय कार्यक्रमास कार्यकर्त्यांची नेहमीच गर्दी असते. प्रत्येक कार्यकर्ता हा मोठ्या नेत्याच्या भेटीसाठी तसेच त्याच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी आतूर झालेला असतो.

मात्र याच वेळी देहभान विसरलेल्या कार्यकर्त्यांच्या पाकिटावर व मोबाईलवर चोरांची नजर असते, याकडे कोणाचेच लक्ष नसते. त्याचीच प्रचिती आज झालेल्या कार्यक्रमात दिसून आली. (Amalner thief theft wallet of 21 people 15 Mobile missing Jalgaon Crime News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय विभागातर्फे राज्यव्यापी कार्यकर्ता शिबिर उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह विविध मान्यवर आज अमळनेरात दाखल झाले होते.

त्यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी चक्क २१ जणांच्या खिशावर हात साफ केला. त्यांची पाकिटे लंपास केली, तसेच १५ जणांचे मोबाईलही हात चलाखीने गुपचूप चोरले. जणू काही चोरांची गॅंगच या कार्यक्रमाला उपस्थित होती की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकीकडे दंगलीमुळे अमळनेर शहर हे अशांत होते. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित व सुरळीत पार पडावा, यासाठी पोलिसांची मोठी फौज अमळनेरात दाखल झाली होती, अन् या पोलिसांच्या फौजेसमोरच चोरांच्या या गॅंगने आपली हातचालाखी दाखवत पाकिटमार केले. विशेष म्हणजे, यात या पाकिटमारांनी पत्रकारांनाही सोडले नाही.

पत्रकार मिलिंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गौरव पाटील यांचे सुमारे २० हजार, मनोहर निकम यांचे दहा हजार यांच्यासह २१ जणांचे पाकीटे चोरली निवृत्त शिक्षक अरुण शिंदे यांच्यासह १५ जणांचे मोबाईलही चोरले गेले आहेत. यावेळी चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

‘त्या’ घटनेची झाली आठवण!

पंधरा वर्षांपूर्वी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे एका प्रचार सभेसाठी पारोळा येथे आले होते. त्यावेळी चोराने चक्क आर. आर. आबांच्या बटव्यावरच हात घातला होता.

हा बटवा चोरत असताना त्या चोराला ताब्यात घेतले होते. त्या घटनेची आठवण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झाली. जर चोर हा वरिष्ठ नेत्याच्या बटव्यावर नजर ठेवू शकतो तेथे सामान्य कार्यकर्ता काय परिस्थिती राहील याचा विचार केलेलाच बरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT