Scenes from the play 'Sampel ka kayki ha khel sawalyancha' which was presented in the state drama competition on Wednesday. esakal
जळगाव

Rajya Natya Spardha 2023 : अगम्य सावल्यांचा अतर्क्य खेळ

सकाळ वृत्तसेवा

Rajya Natya Spardha 2023 : पाऊस पडेल का? असा प्रश्न नंदीबैलाला विचारल्यावर तो मान कशी हालवतो यावर प्रत्यक्षात पावसाचे आगमन जरी ठरत नसले तरी, त्या प्रश्नातून भविष्याबद्दलची चिंता आणि आशा दोन्ही व्यक्त होत असतात. आशावादी व्यक्ती नंदीबैलाच्या त्या मानेच्या हालचालीचा अर्थ, लवकरच पाऊस पडणार असा लावेल आणि निराशावादी व्यक्ती हे मान हालवणे म्हणजे दुष्काळाची शक्यता असल्याचे सांगेल. (An absurd game of unfathomable shadows rajya natya spardha 2023)

प्रश्न अर्थातच, फक्त नंदीबैलापुरता अथवा त्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. आशा आणि निराशा या दोन प्रवृत्ती आहेत. जवळजवळ परस्परविरोधी आणि तरीही त्या दोन्ही प्रवृत्तींना जोडणारा एक धागा आहे. तो धागा किती पक्का आहे, यावर आपल्या मनाची स्थिती किती दोलायमान ते ठरते.

अगम्य वाटणाऱ्या अनेक प्रसंगांच्या साखळीतून पुढे जात असतानाच एक संगत लागणाऱ्या गोष्टीची अनुभूती देणारे रमेश भोळे लिखित व महेंद्र खेडकर दिग्दर्शित ‘संपेल का कधीही हा खेळ सावल्यांचा’ हे नाट्य जळगावच्या दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेने सादर केले. महाराष्ट्र सरकारच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे सहावे पुष्प गुंफताना छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात हे नाटक सादर झाले.

माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना-प्रसंगांचे खोलवर पडसाद त्याच्या मनावर उमटत असतात. त्यातून माणसांची विचारचक्रं गतिमान होत असतात. मनातल्या मनात अनेक गोष्टींची अकारण संगती लावून माणसं स्वत:ला हवा तसा निष्कर्ष काढतात. अनेकदा त्यात तथ्य नसतं ; पण तो विचार मनाला इतका पोखरून काढतो, की त्या विचाराभोवती त्या माणसाचं जीवन फिरू लागतं.

त्याचा परिणाम माणसाच्या वागण्या-बोलण्यावर होतो. त्याच त्या विचाराच्या गुंत्यात अडकल्यामुळे सहवासात येणाऱ्या माणसांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यातून सर्वांना एकाच तराजूत मोजण्याची मानसिकता तयार होते. त्यामुळे नातेसंबंधात कारण नसताना ताण निर्माण होतो.

संशयाचं धुकं दाटायला लागतं. हे सारे मनाचे खेळ असतात ; पण अनेकदा या खेळामुळे जीवनात आशा-निराशेच्या लाटालहरी निर्माण होतात. लहानपणी अनाथ झालेले दोन भाऊ आपापल्या मार्गाने जीवनक्रम चालवतात. वर्तमानातील घटनेला भूतकाळातील आठवणींची झालर देत हे नाट्य पुढे सरकते.

लेखक म्हणून रमेश भोळे यांनी इंग्रजी कथानकाचा आधार घेत लिहिलेल्या या नाट्यातील अगम्यता पोचवण्यात तसेच मोहनची भूमिका साकारण्यात महेंद्र खेडकर सहजपणे रंगमंचावर वावरतात. मात्र त्याचवेळेस विकास (राहुल पवार) यांची सहज व समर्थ साथ त्यांना मिळाली असती, तर या वर्तमान-भूतकाळाच्या खेळात अजून रंगत आणता आली असती.

पाठांतर व रंगमंचीय हालचालींपेक्षा, रंगमंचावर वावरण्यात असलेला आत्मविश्वास तुमचे काम बरेचसे सोपे करून टाकतो. नाट्याचा प्रयोग अधिक प्रभावी व प्रवाही होण्यासाठी कलावंतांच्या अभिनयाला साथ हवी असते, ती तांत्रिक बाजूंची.

तांत्रिक अंगांचा विचार करता, या सावल्यांच्या खेळातील प्रकाश-अंधार रमेश भोळे (प्रकाशयोजना), संवादांना प्रभावशाली करणारे पंकज बारी (पार्श्वसंगीत), प्रसंगोचित पण सूचक किरण कढरे (नेपथ्य) यांचा अभाव असल्याने, हे अतर्क्य नाट्य अगम्यपणाच्या वळणावर येऊन थांबते.

तांत्रिक बाजूत रंग व वेशभूषा (जयश्री पाटील), रंगमंच व्यवस्था (आकाश भावसार) यांची होती. वर्तमान-भूतकाळाच्या अगम्य खेळाची अनुभूती प्रेक्षकांना देत एका वेगळ्या धाटणीच्या सादरीकरणाचा नाट्यानंद दिल्याबद्दल दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन!

शुक्रवारचे (ता. १) नाटक

‘ती’

लेखक : विभावरी मोराणकर

दिग्दर्शक : प्रांजल पंडित

सादरकर्ते : साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT