Dilip Jagtap was stabbed in the hand 
जळगाव

Jalgaon Crime News : कजगावात शेतकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न; दरोड्यानंतरची घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथे दोन घरांवर पडलेल्या दरोड्याला घटनेला २० तास होत नाहीत, तोच कजगाव-भडगाव या राज्य महामार्गावर पासर्डी (ता. भडगाव) येथील शेतकऱ्याला चाकूने हातावर वार करून लुटण्याचा प्रयत्न सोमवारी (ता. २) करण्यात आला.

शेतकऱ्याने समयसूचकता दाखवत आरडाओरड केल्याने लुटारूंचा रस्तालुटीचा डाव फसला. लुटीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञातांनी जगताप यांच्या हातावर चाकूने वार करून तेथून पळ काढला. दरोड्यापाठोपाठ रस्तालुटीचा प्रयत्न झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. (An attempt to rob farmer by stabbing in hand jalgaon crime news)

येथील स्टेशन भागातील रहिवासी राजश्री देशमुख व गोंडगाव रस्त्यावरील ओंकार चव्हाण यांच्या घरावर सशस्त्र दरोड्याची घटना सोमवारी (ता. २) घडली. यात रोकड व सोने-चांदीच्या वस्तू मिळून सुमारे सात लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून दोन्ही घरांतील सदस्यांना जबर मारहाण केली होती.

या घटनेला २० तास होत नाहीत, तोच कजगाव-भडगाव राज्य महामार्गावर पासर्डी येथील रहिवासी दिलीप अर्जुन जगताप (वय ६०) यांना लुटण्याचा प्रयत्न झाला. जगताप हे रात्री जेवणानंतर आपल्या हॉटेलच्या १०० मीटर अंतरावर शतपावली करीत असताना कजगावच्या दिशेने तीन युवक मोटारसायकलने आले व दिलीप जगताप यांच्याजवळ त्यांनी मोटारसायकल थांबवली.

त्यांना ‘मोबाईल दे, पैसे दे’ म्हणत धमकावू लागले. इथे दारूचे दुकान कुठे आहे, अशी विचारणाही केली. जगताप यांनी पैसे व मोबाईल देण्यास नकार देताच अज्ञात तिघांपैकी एकाने त्यांच्या हातावर चाकूने वार केला. वार करताच जगताप यांनी आरडाओरड केल्याने काही तरुण धावत आले.

त्यांना पाहताच अज्ञात तिघांनी तेथून भडगावच्या दिशेने दुचाकीवरून पळ काढला. ही घटना काही अंतरावर असलेल्या हॉटेलवरील मुलांना कळताच मुले मोटारसायकलने घटनास्थळी येत तेथून काहींनी तीन अज्ञातांचा पाठलागही केला.

मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत तिघे पसार झाले होते. या घटनेची माहिती कजगाव पोलिस मदत केंद्रावरील शिपाई नरेंद्र विसपुते यांना कळताच त्यांनी तत्काळ भडगाव पोलिसांना कळविले. त्यानुसार, कजगाव-भडगाव मार्गावर पोलिस तैनात करण्यात आले. मात्र, अज्ञातांनी मधल्या मार्गाने पळ काढल्याने ते मिळून आले नाहीत.

वाढत्या गुन्हेगारीला आळा घाला

कजगावात एकामागून एक अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. पोलिसांकडून अशा घटनांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत आहे. अशातच येथील पोलिस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसच नसल्याने खाकीचा धाकच संपला आहे. दरोड्यानंतर लगेचच रस्तालुटीचा प्रयत्न झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी येथील पोलिस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिस नियुक्त करावा, अशी मागणी व्यापारी बांधवांसह ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT