Accident News  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू; मेहू-टेहू गावाजवळील घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्त्यावर उभ्या असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मेहू-टेहू (ता. पारोळा) येथे शुक्रवारी (ता. २५) घडली.

या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी धुळ्यात हलविण्यात आले आहे. (An old man died in bike accident jalgaon news)

याबाबत बाळासाहेब नथू पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली, की जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक अशोक भीमराव पाटील (वय ६५) हे पारोळा- कजगाव रस्त्यावरील मेहूटेहू ते भामरखेडे मारुतीदरम्यान असलेल्या त्यांच्या शेताच्या रस्त्याजवळ कजगाव रोडवर त्यांच्या दुचाकीसह (एमएच १९, बीपी ५५१५) उभे होते.

पारोळा येथून युरिया खताची गाडी येत असल्याने ते वाट पाहत तेथेच उभे होते. त्या दरम्यान तामसवाडीकडून राजेश सुभाष शेलार (वय २५), जितेंद्र कौतिक महाजन (२१, दोघे रा. तामसवाडी) हे दोन तरुण दुचाकीने येत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याच वेळी तेथे उभे असलेले अशोक पाटील यांना दुचाकीने मागाहून जबर धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला, हाता-पायांना व कमरेला जबर दुखापत झाली. अपघातात दोन्ही तरुणही जखमी झाले आहेत.

तिघांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता अशोक पाटील यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले; तर दोन तरुणांवर डॉ. कल्याणी पाटील, डॉ. राजेश वाल्डे, परिचारिका सुनीता कासार, अभिजित राजपूत, शोभा बोरसे, सुहानी पाडवी, भटू कुवर यांनी प्रथमोपचार करून १०८ रुग्णवाहिकेतून धुळे येथे हलविले. बाळासाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT