Anandacha Shidha sakal
जळगाव

Anandacha Shidha : दिवाळीपूर्वीच मिळणार आनंदाचा शिधा : जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड

सकाळ वृत्तसेवा

Anandacha Shidha : गौरी-गणपतीच्या पार्श्‍वभूमीवर आनंदाचा शिध्याचे वितरण झाल्यानंतर आता राज्य शासनाने रेशनकार्डधारकांची दिवाळीही गोड करण्याचे ठरविले आहे. गोरगरीब लाभार्थ्यांचे सण, उत्सव गोड करण्याच्या दृष्टीने आनंदाचा शिधा मंजूर केला आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी ६ लाख १२ हजार ७६० संच मंजूर झाले असून, लवकरच या संचाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. (Anandacha shida will be available before Diwali jalgaon news)

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमीत्त एक किलो साखर, एक लीटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा शिधा जिन्नस समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रूपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिशिधापत्रिका एक असे या संचाचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी ६ लाख १२ हजार ७६० आनंदाचा शिधा संच मंजूर झाले आहेत. या संचाचे तालुका कार्यालयांना वितरण केले जात आहे. त्यामुळे यंदाही गोरगरीब लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

तालुकानिहाय मंजूर संच

* तालुका--संच मंजूर

* पारोळा--३०१०५

* पाचोरा--४५०००

* चोपडा-- ४४४४३

* बोदवड-- १५१९५

* धरणगाव-- २९७१०

* अमळनेर-- ४६३०७

* भडगाव- २६८८५

* चाळीसगाव-- ६१०८३

* जळगाव-- ८३९८८

* जामनेर-- ४७५८२

* मुक्ताईनगर-- १७६६५

* कुऱ्हा-- ९४३५

* यावल--३७२६५

* एरंडोल--२५३६३

* भुसावळ--३८५००

* रावेर--३५४५२

* सावदा-- १८७८२

एकूण-- ६ लाख १२ हजार ७६०

"राज्य शासन दिवाळीत आनंदाचा शिधा यंदाही लाभार्थ्यांना देणार आहे. जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या संचाचे वितरण करण्याचे कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे. दिवाळीपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्याचा प्रयत्न आहे." -संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT