Jalgaon News : देशातील शेतकऱ्यांना चुकीच्या धोरणामुळे कर्जाच्या विळख्यातून मुक्त होऊ न देणारे धोरण अवलंबल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही.
शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटविण्यासाठी आयात, निर्यातीचे धोरण व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.(Anil Ghanwat statement of Government's policy of looting farmers indebted jalgaon news)
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पारोळा येथे शेतकरी चर्चासत्रात मार्गदर्शन करीत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीचे अध्यक्ष सीमा नरोडे व शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख शशिकांत भदाणे उपस्थित होते. अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, की देशात व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली आहे.
विचारधारा कोणत्याही पक्षाला राहिली नसून सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे व फोडाफोडीचे राजकारण करणे, परत सत्ता मिळविणे, सत्ता मिळवून पिढ्या खातील अशी संपत्ती जमा करणे याच्यात रस दिसून येत असल्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. मार्गदर्शक अरविंद बोरसे यांनी आपण शेतकऱ्यांकडून कसा टॅक्स जमा होतो, याबाबत सखोल अशी मार्गदर्शन केले.
या वेळी महिला प्रदेशाध्यक्ष सीमा नरोडे यांनी सुद्धा संबोधन करताना, शेतकरी कसा व किती लुटला जातो, कायदा व सुव्यवस्था, याविषयी त्यांनी उदाहरणासह मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील कार्यकर्ता सक्षम होऊन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल व पक्ष बळकट करण्यासाठी कशा पद्धतीने आपण योगदान देऊ शकाल, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन दौऱ्यात पारोळा येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख शशिकांत भदाणे, पूर्व जिल्हाध्यक्ष विभाग दगडू शेळके मार्गदर्शक अरविंद बोरसे, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष भिकनराव पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील, जगदीश मनोरे, अनिल पाटील, सुनील वानखेडे, भिकन पाटील, योगेश पाटील, आडगाव तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, भागवत महाजन, भोंडण दिगर लोकनियुक्त सरपंच अधिकार पाटील यांच्यासह जिल्ह्यातून शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.