gharkul yojana news esakal
जळगाव

Gharkul Scam News : घरकूल घोटाळ्यातील दोषींकडून वसुली करावी : अनिल नाटेकर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी तत्कालीन ४८ नगरसेवकांकडून घरकुल घोटाळ्यातील जबाबदारी निश्‍चीती प्रकरणातील १ कोटी १६ लाख रूपये वसूल करावेत. पंधरा दिवसांत ही कारवाई करावी, अन्यथा औरंगाबाद खंडपिठात पीआयएल दखल करण्यात येईल.

अशा आशयाची नोटीस आयुक्त गायकवाड यांना दिली असल्याची माहिती सामाजीक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी शनिवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली.

श्री. नाटेकर म्हणाले, की तत्कालीन आयुक्त प्रविण गेडाम यांनी घरकुल योजना घोटाळा बाहेर काढला होता. २००६ ला दाखल केलेला गुन्हा, तत्पूर्वी विभागीय आयुक्तांनी २००२ मध्ये तपासणी करून दिलेले आदेश, हुडको घरकूल योजना कामी ५९ कोटी बेकायदेशीर रितीने खर्च केला. (Anil Natekar Say Gharkul scam Recovery should be made from culprits Notice to Commissioner Notice to go to bench Jalgaon News)

तसेच, विशेष लेखा परिक्षक (नाशिक) यांनीही तत्कालीन ४८ नगरसेवकांकडून सामुहिक जबाबदारी म्हणून १ कोटी १६ लाख निश्‍चीत केली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १० नूसार पालिका सदस्य अपात्र आहेत, असे नमुद करण्यात आले आहे.

त्यानूसार विश्‍वस्त या नात्याने महापालिकेस देय असलेली थकबाकी ५९ कोटी तत्कालीन नगरसेवकांकडे निघत आहे. त्यानंतर शासन शहर विकास मंत्रालय आदेश क्रमांक १३३६ ता. ८ जूलै २०१३ ला तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी अंडर सेक्शन ४९३ नूसार संबंधित नगरसेवकांना नोटीसा बजावल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, आजपर्यंत संबंधितांकडून तत्कालीन व विद्यमान आयुक्तांनी वसूलीबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. संबंधित नगरसेवकांकडून रक्कम वसूल करण्यास कोणत्याही न्यायालयाने स्टे दिलेला नाही.

यामुळे महापालिका आयुक्त ती रक्कम वसूल करू शकतात. पंधरा दिवसात आयुक्तांनी रक्कम वसूल करावी, अन्यथा खंडपिठात आय. पी. एल. दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईश्‍वर मोरे, शिवराम पाटील, राकेश वाघ, बंटी शर्मा, दिनेश भोळे आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT