Jalgaon Gram Panchayat Election : जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींचा निवडणूक बिगूल वाजताच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. १६ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, गावगाडा आतापासूनच तापत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींची ही निवडणूक राजकीय पक्षांच्या दृष्टीने लोकसभेसाठी चाचणी परीक्षाच असेल. राजकीय पक्षांच्या चिन्हावर या निवडणुका होत नसल्या तरी याद्वारे पक्षाचे असलेले प्राबल्य दिसून येते.
त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचा कस लागेल. पारोळा तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींची निवडणूक तर आठ रिक्त जागांवर पोटनिवडणूक होत आहे. (Applications can be submitted from October 16 Jalgaon Gram Panchayat Election news)
चोपडा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीचा निकाल ६ नोव्हेंबरला लागणार असल्याने दिवाळीपूर्वीच फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे.
जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत संपणाऱ्या तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसंदर्भात पारोळा तालुक्यात ग्रामपंचायत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी होणार असून, कोणता पक्ष किती ग्रामपंचायतींवर ताबा मिळू शकतो.
येणाऱ्या दिवसात ठरणार आहे. तालुक्यातील खेडी ढोक, दगडी सबगव्हाण, पोपट नगर, वाघरे वाघरी, भोंडणदिगर, मोंढाळे प्र. ऊ., खोलसर, कामतवाडी, उडणी दिगर, उडणी खालसा, चहुत्रे, शेवगे प्र.ब, मोहाडी, दहिगाव अशा अकरा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे.
दरम्यान, १६ ते २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. २३ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. २५ ला माघारीची अंतिम तारीख, त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तर ५ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान तालुक्यात राजकीय समीकरण पाहिले तर शिंदे गट शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पक्ष असे प्रमुख पक्ष आहेत.
तर काही तर तालुक्यात शिंदे गट शिवसेना व शरद पवार गट राष्ट्रवादी यांच्या हाती तालुक्यातील ग्रामपंचायतीची सत्ता आहे. दरम्यान, अकरा ग्रामपंचायत निवडणुकीबरोबर आठ ग्रामपंचायतची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
पोटनिवडणूक रिक्त ८ जागा व आरक्षण असे : पिंप्री प्र. उ (३ जागा) ओबीसी, पिंप्री प्र. उ (१ जागा) एससी महिला, लोणी खुर्द (३) सर्वसाधारण, शेळावे खुर्द (१) अनुसूचित जमाती, विचखेडे (२) अनुसूचित जमाती, म्हसवे (३) एससी महिला, महाळपूर (१) अनुसूचित जमाती, महाळपूर (३) अनुसूचित जाती.
चोपडा तालुक्यातही ज्वर वाढला
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर होताच त्या त्या गावातील संभाव्य उमेदवार कामाला लागले असून, जनतेतील रामराम वाढला आहे. चोपडा तालुक्यातही निवडणुकीची धामधूम वाढली आहे. चोपडा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या टप्यात तालुक्यातील आडगाव, अडावद, लासूर, गणपूर या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामीण पातळीवर या निवडणुका होणार असल्या तरी पक्षीय कार्यकर्ते निवडणुकीत नशीब अजमावण्याच्या तयारीत असून, कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. तालुक्यातील वडती, मालखेडा, वाळकी,आडगाव, वडगाव बुद्रुक, विषणापूर, सुटकार, लासूर, तावसे बुद्रुक, अडावद, कठोरे, धूपे बुद्रुक, वराड, गणपूर, अनवर्दे खुर्द, विचखेडा, अंबाडे, पारगाव,नरवाडे, घुमावल बुद्रुक, तावसे खुर्द, कोळंबा या गावात सध्या निवडणुकीचा ज्वर वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.