Gulabrao Patil esakal
जळगाव

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा, वारकरी भवन उभारण्यास मान्यता : पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २१) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविण्यासाठी एक कोटी रुपये व खेडी येथे अद्ययावत वारकरी भवन उभारण्यासाठी सात कोटी रुपयांचा ठराव करून या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील ६४ ठिकाणांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासही या वेळी मान्यता देण्यात आली. (Approval to construct Varkari Bhavan statue of poetess Bahinabai jalgaon news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान असोदा येथे त्यांच्या स्मारकासाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाकडून १२ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याठिकाणी भव्य स्मारक साकारण्याचे काम बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी दिले.

केळी विकास महामंडळाला हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव पालकमंत्री पाटील यांनी या वेळी मांडला. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्ष‍िक योजना २०२२-२३ च्या आराखड्याचे सादरीकरण केले. पालकमंत्री म्हणाले, आगामी काळात विविध निवडणुकांमुळे आचारसंहिता लवकर लागू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे विकासकामांसाठी कमी दिवस आहेत. तेव्हा जिल्हा परिषद, पालिका, महापालिका व राज्य शासकीय यंत्रणांच्या विभागप्रमुखांनी योग्य नियोजन करून शंभर दिवसांत प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर आदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून शंभर टक्के निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बैठकीत मंजूर झालेले ठराव

आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध महत्त्वाचे ठराव करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात १४ प्राथमिक आरोग्य केंद्र व १०९ उपकेंद्र स्थापन करणे, रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन विकास आराखडा तयार करून शासनास मंजुरीस्तव सादर करणे, जळगाव शहर किंवा लोकसभा मतदारसंघात कुठेही नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करणे, प्रत्येक तालुक्यात ग्रामविकास विभागाकडून कमीत कमी दहा याप्रमाणे एकूण १५० इमारती फर्निचरसह बांधकामासाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ४० कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरावरून मंजुरी व निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देणे.

शासन आपल्या दारी उपक्रम राबविल्याबाबत तीनही मंत्र्यांचे, खासदार, आमदार व जिल्हा प्रशासन यांचे अभिनंदन करणे, जिल्ह्यात पोलिसपाटील व कोतवाल भरतीप्रक्रिया पारदर्शकपणे राबविल्याबद्दल, तसेच अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करणे, महाऊर्जा (MEDA) विभागामार्फत जिल्ह्यातील ज्या शाळांत विजेची सोय नाही किंवा वीजबिल भरू शकत नाही अशा शाळांना सौरऊर्जा प्रकल्प बसविणे, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत बांधकामास ग्रामविकास विभागाकडून मान्यता मिळणे आदी महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT