Argument between 2 groups as dindi members were pelted with stones  esakal
जळगाव

Jalgaon News : दिंडीवर भिरकावला दगड; पाळधीत दोन गटांत वाद

सकाळ वृत्तसेवा

पाळधी (जि. जळगाव) : जळगाव येथून वणी गडावर दिंडी जात असताना पाळधी गावात दिंडी आली असता कुणीतरी दगड भिरकावल्याने दिंडीतील सदस्यांना लागला. त्यावरून दोन गटांत वाद निर्माण झाला. (Argument between 2 groups as dindi members were pelted with stones jalgaon news)

दोन गटांमधील वाद वाढत जाऊन थेट पोलिस ठाण्यात पोचला. यावेळी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. दगडफेक झाल्याच्या चर्चेने मोठा जमाव जमला होता. त्यामुळे पाळधी पोलिस दुरक्षेत्रात दोन्ही गटातील तणावाला शांत करण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

पाळधी गावात रात्री दहाच्या सुमारास दोन्ही गटाकडून चारशे ते पाचशे लोकांचा जमाव एकमेकांसमोर आल्याने जोराद दगडफेक सुरू झाली. समाजकंटकांनी काही दुकानांची तोडफोड करून पोलिसांच्या गाड्यांवर तसेच रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली.

रात्री अकरा वाजता रस्त्यावर दगडांच्या खच दिसून आला, या बाबत जळगाव व धरणगावहून पोलिसांची कुमक मागविण्यात आली असून, गावातील रस्त्यावर पोलिसांचा पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही गटांमध्ये अचानक दंगल घडल्याने पाळधी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा तैनात

जळगाव येथून वणी (जि. नाशिक) येथे दर्शनास निघालेल्या दिंडीवर पाळधी (ता. धरणगाव) गावात दगडफेक झाल्याची घटना घडली. एका प्रार्थनास्थळा जवळून डि.जे.च्या वाहनासोबत जात असलेल्या दिंडीकऱ्यांवर अचानक दगडफेक झाल्याने सुरवातीला गर्दी पाळधी औटपोस्टला दाखल झाली.

तद्‌नंतर दोन्ही बाजूचा जमाव समोरासमोर येऊन तुफान दगडफेकीसह काही दुकाने पेटवून दिल्याची घटना घडली. घटनेचे वृत्त कळातच जिल्हा पोलिस अधीक्षक एस.राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा पाळधीत दाखल झाला. जळगावसहीत एरंडोल, धरणगाव, अतिरिक्त पोलिस कुमक मागवण्यात आली.

पोलिसांच्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीत वाहनांचे काच फुटून नुकसान झाले. या वेळी काही दुकानावर दगडफेक करण्यात आली. दंगानियंत्रण पथक, शीघ्रकृती दलासह राखीव पोलिस दलाच्या जवानांनी दोन्ही बाजूचा जमाव पांगवण्यासाठी तुरळक प्रमाणात लाठीमार करून उपद्रवींना झोडपून काढले.

रात्री अकरा वाजेच्या सुमारास पाळधी गावात तणावपूर्ण शांतता होवुन पोलिसांनी घटनेवर नियंत्रण मिळवीत अटकसत्रास प्रारंभ केला होता. पाळधी गावात शांतता प्रस्थापित करण्यात आली असून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT