जळगाव : शहरातील फुले मार्केटमध्ये दुकान लावण्यावरून गुरुवारी (ता. २) अतिक्रमणधारक व दुकानदार यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संपूर्ण मार्केटच बंद ठेवले. मार्केटमधील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमध्ये वाढत्या अतिक्रमणाबाबत नेहमीच तक्रारी आहेत. या ठिकाणी अतिक्रमण एवढे झाले आहे, की खरेदीस येणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी जागाही राहत नाही. याठिकाणी अतिक्रमणधारकांचे कायमच वाद होत असतात. (Argument between encroachers shopkeepers in Phule Market Shops closed by traders demand for permanent action Jalgaon News)
हे अतिक्रमण हटवावे, यासाठी अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपल्याकडे कर्मचारी नसल्याची व पोलिस संरक्षण मिळत नसल्याचीही तक्रार अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी करीत असतात. त्यामुळे या ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाई होत नाही.
दुकान लावण्यावरून वाद
फुले मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी दुकाने उघडल्यानंतर अतिक्रमणधारकांनीही आपली दुकाने लावण्यास प्रारंभ केला. त्या वेळी एका कापड दुकानासमोर
अतिक्रमणधारक दुकाने लावत असताना, त्यांना दुकानदाराने मज्जाव केला. मात्र अतिक्रमणधाारकाने उलट दुकानदारालाच अरेरावी केली. यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यामुळे व्यापारीही संतप्त झाले.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
व्यापाऱ्यांनी केली दुकाने बंद
फुले मार्केटमधील अतिक्रमणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध केला. सकाळपासूनच फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटची दुकाने बंद होती. संपूर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व शहर पोलिस ठाण्याला निवेदन दिले.
महापालिकेची कारवाई, पण बंदोबस्त मिळेना
फुले मार्केटमध्ये वाद झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. व्यापारी पोलिस ठाणे व महापालिकेतही थडकले. त्यांनी अतिक्रमण काढण्याची मागणी केली. महापालिकेचे अधिकारीही जागे झाले. त्यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त घेण्यास गेले. मात्र, त्यांना पोलिस बंदोबस्त मिळाला नाही. अखेर दुपारी तीनला पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणावर कारवाई केली. तोपर्यंत अतिक्रमणधारक आपला माल घेऊन निघून गेले होते. मात्र, त्या ठिकाणचे साहित्य कर्मचाऱ्यांनी जप्त केले.
कारवाई करा; अन्यथा बेमुदत बंद
फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापौर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट ‘नो हॉकर्स’ झोन आहे. मात्र, त्या ठिकाणी अनेक हॉकर्सची दुकाने लागलेली असतात. त्यामुळे ग्राहकांनाही येण्या-जाण्यास जागा राहत नाही.
शिवाय अतिक्रमणधारक नागरिक व दुकानदारांशी कायम वाद घालत असतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वाद होतात. या अतिक्रमणधारकांवर कायमस्वरूपी कारवाई करावी, अन्यथा बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. हिरालाल मंधान, संजय जैन, सुनील जाधवानी, श्यामलाल बाळकृष्ण वाणी आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.