Jalgaon Crime News : रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल सायकल चोरीच्या गुन्ह्यात संशयावरून चौकशीला ताब्यात घेतलेल्या भामट्याने नुसती गुन्ह्याची कबुलीच दिली नाही, तर एकामागून एक अशा तब्बल ३१ चोरीच्या सायकल्स पोलिसांना काढून दिल्या. (Arrested for stealing bicycles from outside class and parking lot Jalgaon Crime News)
जळगाव शहरात विविध अपार्टमेंट, खासगी क्लासेसबाहेरुन सायकल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. सहसा कुणी सायकल चोरीची तक्रार देत नाही. म्हणून चोरट्यांचे बऱ्यापैकी फावते.
असा लागला तपास
शहरातील शिवकॉलनी गणेश पार्क येथील रहिवासी गिरीश गोविंदा खैरकर (वय-२२) याची सायकल २१ डिसेंबर २०२२ चोरी झाली होती. रामानंद नगर पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामानंदनगर पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हेशोध पथकाला माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दीपक वंजारी यांच्या पथकाने संशयित जयेश अशोक राजपूत (वय-२२ रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा.) याला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. संशयिताने कबुली दिली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दहा हजारांची सायकल दोन हजारांत
जयेश राजपूत हा तरुण मिळेल तेथून सायकल लंपास केल्यानंतर बहुतांश सायकली या भंगारवाल्यास किंवा गाव खेड्यातील मुलांना विकत होता. दहा हजारांची मूळ किंमत असलेली सायकल चक्क दोन हजारात विकत असल्याने त्याच्याकडून सायकलींची जास्तच मागणी वाढल्याने जयेशने चोऱ्यांचा सपाटाच लावला होता.
पिता सुरक्षारक्षक
पोलिसांनी संशयित आरोपी जयेश याला २१ एप्रिलला राहत्या घरून ताब्यात घेतले. त्याच्या कुटुंबात आई-वडील बहिण असा परिवार असून वडील खासगी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतात. त्याचे जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झाले असून शिक्षण सेाडून त्याने चोरीचा मार्ग धरला आणि कमी वेळातच तो प्रसिद्ध झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.