नामदार अनिल भाईदास पाटील यांचा स्नेह आजवर कार्यकर्त्यांना मिळत आला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध असून, कार्यकर्त्यांना बळ देणार नेतृत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं.
तालुक्याला प्रथमच कॅबिनेट मंत्री पदाची संधी प्राप्त झाल्याचा अमळनेर तालुकावासीयांना अभिमान आहे. मंत्री अनिल पाटील यांचा शुक्रवारी (ता. ७) वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख. (article on cabinet minister anil patil on occasion of his birthday jalgaon news)
एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे अनिलदादा ! तरूणाईचा आदर्श, प्रभावी नेतृत्व, लोकसेवक, समयसूचक, प्रभावी कार्यपद्धती, समाजकार्याची जाण व समाजकार्याची आवड असलेला समाजप्रेमी समाजसेवक व राजकारणी म्हणजे अनिलदादा. समाजकारणासोबत राजकारणाला जोड देत दादांनी आतापर्यंत अनेक यशाची शिखरे सर केली आहेत.
अनिल दादांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधिमंडळाच्या प्रतोदपदी जबाबदारी दिली, तसेच मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद दिले. जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर राहणे, हा त्यांचा मानस आहे.
राजकारणात व समाजकारणात विविध पदांवर काम करत असताना तसेच आमदारपदी विराजमान झाल्यावर दादांनी अविरतपणे आपल्या कामाचा व विकासाचा आलेख उंचावत ठेवला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पालिकेच्या सत्तेवर असताना दूरदृष्टी ठेवत शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, दळण-वळण व रस्त्याची कामे, शहर विकासासाठी प्रयत्न, युवकासाठी सुसज्ज क्रीडासंकुल तसेच शहराच्या सौंदर्यात सुशोभीकरणाने भर घालून शहराचा कायापालट केला. कोरोना काळात आरोग्य शिबिरांसह ऑक्सिजन प्लॅन्ट, कोविड सेंटर, रुग्णवाहिका, आदी सोयी उपलब्ध करून दिल्या.
पाडळसरे धरणासाठी २०२०-२०२१ मध्ये १३५ कोटी, २०२१-२०२२ ला ११० कोटी तर २०२२-२०२३ ला १०० कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. त्याचबरोबर आमदार निधी व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठीची सभामंडप, रस्ते काँक्रिटीकरण, प्लांट, चौक सुशोभीकरण, व्यायाम शाळा, गटारी आदी विकासकामे असून, यासाठी एकूण रक्कम १२०० लक्ष, मृद जलसंधारण बंधारे (एकूण २० बंधारे) एकूण रक्कम १३५० लक्ष, अमळनेर मतदारसंघात ग्रामीण रस्ते व लहान पूल यासाठी रक्कम २६०४ लक्ष, प्रशासकीय इमारत यासाठी रक्कम १४१७ लक्ष यासह मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी दादांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.
(शब्दांकन : गणेश भामरे, अध्यक्ष, विकासो, बाह्मणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.