esakal
जळगाव

Jalgaon News : दहीहंडीसोबत तुटली आयुष्याची दोर! हात गमावलेल्या तरुणाने कुंचल्यातून पुसल्या कटू आठवणी

थरांचा थरार म्हणजे दहीहंडी. हा साहसी खेळ अन् जल्लोष अनुभवण्यासाठी सगळेच आतूर असतात. परंतु, हे साहस अनेकदा जीवावरही बेतू शकते.

मिलिंद वानखेडे

Jalgaon News : थरांचा थरार म्हणजे दहीहंडी. हा साहसी खेळ अन् जल्लोष अनुभवण्यासाठी सगळेच आतूर असतात. परंतु, हे साहस अनेकदा जीवावरही बेतू शकते. असाच २० ऑगस्ट २००३चा दिवस येथील अरूण मालचे यांच्यासाठी काळ बनून आला होता.

गोविंदा पथकाचा भाग बनलेल्या या तरुणाला २२ व्या वर्षी आपला एक हात गमावण्याची वेळ आली. दहीहंडीसह विजेचा खांब कोसळून अरुणचा उजवा हात कायमचा निकामी झाला.

परंतु, या संकटाला धैर्याने तोंड देत त्यांनी गणेशमूर्ती रंगविण्याचे कसब आत्मसात करत, कुंचल्यातून २० वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी पुसून पुन्हा भरारी घेतली आहे. (arun malche started making ganesh idols with one hand jalgaon news)

हरिविठ्ठलनगरच्या बाजारपेठेत २० ऑगस्ट २००३ ला गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीची धूम होती. दहीहंडीच्या रिंगणाभोवती अरुण मालचे हा तरुणही होता. थरांचा थरार सुरू असताना काही लहान मुले गोविंदा पथकात रिंगणात घुसली. त्यांना बाहेर काढताना अचानक दहीहंडीचा दोर तुटला आणि वीजेचा खांब अरुणच्या हातावर कोसळला. या आठवणी सांगताना आजही अरुणचा कंठ दाटून येतो.

घटनेनंतर पळापळ

अरुण मालचे सांगतात, वीजखांब हातावर पडल्यानंतर काय झाले ते मला कळलेच नाही. तातडीने रिक्षातून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. हळूहळू हाताला मुंग्या यायला लागल्या होत्या. मी बेशुद्ध झालो.

शुद्धीवर आल्यानंतर जळगावच्या डॉक्टरांनी मला मुंबईत हलविण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटी स्कॅन, एमआरआय अशा सर्व चाचण्यांनंतर तिथल्या डॉक्टरांनी खर्चाचा अवाढव्य आकडा समोर ठेवला. ते शक्य नसल्याने केईएम रुग्णालयाचा रस्ता धरला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढचे दीड वर्ष तणावात

केईएम रुग्णालयात हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन महिन्यांनी डिस्चार्ज मिळाला. अपघातानंतर पाच- सात महिन्यात बरा होईन, असे माझ्यासह सगळ्यांनाच वाटत होते. परंतु, हाताला कुठलीच संवेदना नव्हती.

अखेर डॉक्टरांनी हात कधीच बरा होणार नाही, असे स्पष्टच सांगितले अन् पायाखालची वाळूच सरकली. पुढचे एक-दीड वर्ष माझ्यासह आई- वडील, संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावात होते. आयुष्य कसे निघणार, याच चिंतेने ग्रासले होते.

बाप्पा धावला मदतीला

अरुण मालचे यांनी घटनेनंतर हळूहळू स्वत:ला सावरत छंदालाच आपला व्यवसाय बनविले. सुरवातीला पेंटिंगचा अनुभव असल्याने त्यांनी विविध मूर्ती रंगकामास सुरवात केली. हातात कला असल्याने डाव्या हातानेच मग आकर्षक मूर्त्या साकारण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांना भाऊ सुनील मालचे यांची मोलाची साथ लाभली.

अरुण यांनी आज आपल्या एका हाताच्या जादुने कुंचल्यातून बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्यांना बोलके केले आहे. जळगावात प्रसिद्ध मूर्तीकार चंदुलाल राणा यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून ते मूर्त्यांना रंगकाम करतात. अरुण, त्यांची पत्नी, दोन मुली व भावाचे कुटुंब हे सर्व एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असून, बाप्पाने आर्थिक घडी पुन्हा बसवून आमच्या कुटुंबाला सावरल्याची भावना अरुण मालचे व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT