Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde esakal
जळगाव

Ashadhi Ekadashi 2023 : प्रतिपंढरपूर पिंप्राळ्यात 148 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव आज; भाविकांची मांदीयाळी!

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi 2023 : पिंप्राळा परिसरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी (ता. २९) रथाची मिरवणूक निघणार आहे. रथाला बुधवारी (ता. २८) पानाफुलांनी सजविण्यात आले.

आकर्षक दिव्यांची रोषणाई रथावर करण्यात आली. रथ पाहण्यासाठी पिंप्राळ्यातील नागरिकांकडे बाहेरगावावरून नातेवाईक आले आहेत. (Ashadhi Ekadashi chariot procession will be held today pimprala jalgaon news)

गुरुवारी श्री विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे पाचला विठ्ठल-रूखुमाई यांचा महाअभिषेक व पूजन होईल. सकाळी सातला वाणी समाजातर्फे अभिषेक पूजन होईल. श्री. विलास, मोनाली वाणी, श्री. पंकज, जागृती वाणी, भगवान वाणी पूजा अभिषेक करतील. साडेदहाला मान्यवरांचा सत्कार गांधी चौकात होईल.

नंतर रथावर विराजमान होणारी राधाकृष्णाची मूर्ती, अर्जुन (सारथी), घोडे, गरुड मूर्ती व हनुमान मूर्तींची विधिवत पूजा होईल. श्री पांडुरंग भजनी मंडळ मंदिरामध्ये टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणी व भजने म्हणतील. दुपारी साडेबाराला मंदिराचे पुजारी श्‍याम जोशी यांच्या मंत्रोच्चारात वाणी समाजातर्फे रथाची महापूजा मीनल व मयूर वाणी करतील.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार सुरेशदादा जैन, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित राहतील. महाआरतीनंतर ‘जानकाबाई की जय’च्या जय घोषात उपस्थित मान्यवर मंडळी व भक्तगण दोराने रथ ओढण्याचा आनंद लुटतील व यात्रेला सुरवात होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी बाराला सुमारास सारथी अर्जुन, हनुमान, गरुड मूर्ती व त्यापुढे घोडे आरुढ होऊन रथ सुशोभीत करण्यात येतो, तसेच रथासमोर पुढे पांडुरंग भजनी मंडळ, पालखीच्या सोहळ्यात टाळ मृदंगाच्या गजरात भजन, गवळणी, अभंग, गाण्यात मन होऊन पंढरपूरचे वातावरण निर्माण होईल. त्यानंतर रथोत्सवाला सुरवात होईल.

रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंग हे भावीकांचे आकर्षण ठरतात. श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची अलोट गर्दी, रथोत्सव मार्गावर आयोजक व भविकांच्या स्वागतासाठी फराळ, चहापाणी व पिण्याचे पाण्याची मोफत सेवा करण्यात येईल.

१४८ वर्षांची परंपरा

पिंप्राळ्यात (कै.) तोताराम नथ्थूशेठ वाणी यांची एकुलती कन्या जानकाबाईचे तरुण वयात निधन झाले. आपल्या मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी श्री पांडुरंगाचा एक सुंदर लाकडी कोरीव काम केलेला रथ श्री विठ्ठल मंदिरास अर्पण केला.

तेव्हापासून ‘जानकाबाई की जय’च्या जयघोषाने पिंप्राळानगरीत आषाढी एकादशीला रथ काढण्याची परंपरा सुरू आहे. रथाला १४८ वर्ष पूर्ण होत आहेत, अशी माहिती रथोत्सव समितीप्रमुख अनिल वाणी व श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास पुरुषोत्तम वाणी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT