Train esakal
जळगाव

Ashadhi Ekadashi Special Train : आषाढीनिमित्त भुसावळ येथून विशेष रेल्वेगाडी

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi Special Train : ‘आषाढी एकादशी’ निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी २८ जूनला भुसावळ येथून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यास मान्यता दिली आहे. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केला होता. (Ashadhi Ekadashi Special train from Bhusawal jalgaon news)

जळगाव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी व भाविकांसाठी मध्य रेल्वेतर्फे पंढरपूर वारीसाठी अनारक्षित ‘विशेष आषाढी’ रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली असता त्यांनी २८ जूनला दुपारी दीडला भुसावळ स्थानक येथून रेल्वेगाडी सुटून २९ जूनला पहाटे साडेतीनला पंढरपूर येथे पोहचणार आहे, तर त्याच दिवशी रात्री साडेदहाला परतीसाठी निघणार असून, ३० जूनला दीडला भुसावळ येथे पोहचणार आहे, याबाबत माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जळगाव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी व भाविकांसाठी २०१४ सालापासून खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने सदर भुसावळ - पंढरपूर - भुसावळ विशेष आषाढी रेल्वे सोडण्यात येत असून याला परिसरातील असंख्य वारकरी भाविकांना लाभ होत आहे. सदर रेल्वेत त्यांच्यामार्फत नाश्ता, जेवण, फराळ व पाण्याची स्वखर्चाने व्यवस्था करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Latest Maharashtra News Updates : थोड्याच वेळात शिवसेनेचा नेता निवडला जाणार

SCROLL FOR NEXT