Jalgaon Crime News : शहरातील शिवकॉलनी ऐंशी फुटी रस्त्यावर चोरीची वाळू नेणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीसह मुलाला चिरडण्याचा प्रयत्न केला असून हा मुलगा बचावला आहे. नीतेश काळे (वय-१४) असे बालकाचे नाव असुन त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (attempt to crush child with illegal sand transport tractor by mafia Jalgaon Crime News)
जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील ऐंशी फुटी रोडवर वर्धमान हाईटस् हे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंट मध्ये नीतेश काळे (वय १४) हा बालक त्याच्या आईसह वास्तव्यास असून आज दुपारी त्याच्या आतेभावासोबत किराणा दुकानावर जाण्यासाठी दुचाकीने तो निघाला होता.
वाहन बंद पडल्याने रस्त्यावर वाहन उभे करून त्याचा भाऊ समोरच घरी पर्स घेण्यासाठी गेला. त्यावेळेस नीतेश उभ्या दुचाकी (एमएच.१९.जीएस.६५०४) जवळच थांबला असताना वाळू ट्रॅक्टरवरील (एमएच.१९.सी.झेड.५९५) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत ट्रॅक्टर रिवर्समध्ये जोरात घेत दुचासकीसह उभ्या नितेशला चिरडण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
या अपघातात नितेशच्या पायाला, पाठीला व खांद्याला जबर दुखापत झाली असून अपघात घडताच परीसरातील रहिवाशांनी एकच धाव घेत आरडा ओरड केल्याने या मुलगा बचावला. तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करून चालकासह नागरीकांनी ट्रॅक्टर रामानंदनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
ट्रॅक्टरवरील चालक गोरख नंदू वाघ (वय २१, रा. सावखेडा ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.