Collector Ayush Prasad while accepting the statement. esakal
जळगाव

Tribal koli Protest : जिल्हाधिकाऱ्यांना साडी-चोळी, बांगड्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न; उपोषणाचा 16 वा दिवस

सकाळ वृत्तसेवा

Tribal koli Protest : आदिवासी कोळी समाजातर्फे गेल्या सोळा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.

मात्र, उपोषणाची अद्यापही दखल न घेतल्याने आदिवासी कोळी समाजाच्या इंदूबाई बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना साडी-चोळी, बांगड्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडल्यानंतर निवेदन देण्यात आले. (Attempt to give saree choli bangles to district collector Tribal koli Protest jalgaon news)

आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचीत जमातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे. बुधवारी (ता. २५) इंदूबाई बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनासह साडी-चोळी व बांगड्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न झाला.

मात्र पोलिसांनी आंदोलकांची समजूत घातली. तर, जिल्हाधिकाऱ्यांनीही आरक्षणाचा अधिकार आपला नसून, राज्य शासनाचा असल्याचे सांगीतले. यामुळे प्रा. भाऊसाहेब सोनवणे, मंगलाताई सोनवणे, बबलू सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली आहेरऐवजी फक्त निवेदन देण्यात आले.

या आहेत मागण्या...

आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला मिळावा. अनेक आदीवासी कोळी समाज बांधवांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाले आहेत, ते आता का देण्यात येत नाही? राष्ट्रपतींचा अध्यादेश कलम ३८.२ अन्वये शेड्यूल ट्राईथ मोडिफिकेशन लिस्ट १९५० नुसार अनुसूचित जमातीमध्ये आमची जमात नेमून दिलेली आहे.

तसेच, प्रथमदर्शनी पुरावा पाहून तत्काळ अनुसूचित जमातीचे प्रमाण देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. तरीही आदिवासी कोळी समाजावर हेतू पुरस्सर अन्याय केला जात असून उपोषणकर्त्यांना न्याय देऊन कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, असे निवेदनात म्हटले आहे. आदिवासी कोळी समाजाच्या महिला व समाजबांधव या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT