जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या पुरवठा विभागाच्या गुदामात साठा तपासणीसाठी आलेल्या पुरवठा निरीक्षकाची गुदाम व्यवस्थापकाने कॉलर पकडून मारहाणीचा प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी (ता. २२) दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडला. या प्रकारामुळे गुदाम परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
दिवाळीनिमित्त शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ वितरीरित केला जात आहे. हा शिधा आणि पुरवठा विभागाचे इतर धान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील गुदामात साठवले जाते. साठा नियंत्रणासाठी याठिकाणी गुदाम व्यवस्थापक म्हणून श्रीकांत माटे यांची नियुक्ती आहे. गुदामातील साठ्याची वेळोवेळी पुरवठा निरीक्षकांमार्फत तपासणी केली जाते.
जिल्ह्यात सुरू असलेल्या धान्य वितरणाची नेमकी आकडेवारी घेण्यासाठी शनिवारी दुपारी साडेचार ते पाच यादरम्यान पुरवठा निरीक्षक पी. पी. पाटील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील गुदामात गेले होते.(Attempted beating of supply inspector by warehouse manager Jalgaon Crime News)
याठिकाणी उपस्थित असलेले गुदाम व्यवस्थापक माटे यांच्यासमवेत त्यांची सुरवातीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर माटे यांनी हमालांच्या मदतीने चक्क पुरवठा निरीक्षक पी. पी. पाटील यांची कॉलरच पकडून मारहाणीचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी इतर काहींनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला.
पुरवठा अधिकाऱ्यांकडून समज
दिवाळीनिमित्त लाभार्थ्यांना धान्य वितरण आणि आनंदाचा शिधा वाटपाचे काम सुरू आहे. अशा वेळी गुदाम व्यवस्थापकाकडून पुरवठा निरीक्षकालाच बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी तातडीने गुदाम व्यवस्थापक आणि पुरवठा निरीक्षकांना बोलावून घेत समज दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.