खिर्डी (जि. जळगाव) : तालुक्यातील बलवाडी येथील शेतशिवारातील ज्ञानेश्वर महाजन यांच्या शेताजवळ असलेल्या जलसिंचन पाणी योजनेच्या (irrigation water scheme) मोटारीचा चोरीचा (Motor Theft) प्रयत्न पोलिस पाटील व ग्रामस्थांनी हाणून पाडला. या प्रकरणी संशयितांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Attempted theft of electric motor of irrigation water scheme Thieves arrested Jalgaon Crime News)
पुरी गोलवाडा येथील पोलिस पाटील व काही शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिवळ्या रंगाची ॲपेरिक्षा (एमएच १९, बीएम ३७४०) ही संशयितरीत्या उभी होती. या बाबत पुरी गोलवाडा येथील शेतकरी ईश्वर तायडे, पोलिस पाटील किरण पाटील, सुधीर पाटील यांनी चालकाची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे अधिकच संशय बळावला. त्यांनी सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी त्यांना चैन कप्पी व तुटलेला दोर दिसला, तसेच चोरट्यांनी जी मोटार फोडली होती, ती तब्बल साडेआठ क्विंटल वजनाची असल्यामुळे जो दोर आढळून आला होता, तो दोर वारंवार तुटत असल्याने चोरट्यांचा डाव इथेच फसला. या बाबत शेतकऱ्यांनी घटनेची माहिती निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांना दूरध्वनीद्वारे दिली. त्यांनी त्वरित आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिसराची पाहणी केली असता चोरीचे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी या बाबत पुरी गावचे पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित निसार हारून पिंजारी (वय ३४) व आरिफ हारून पिंजारी (वय ३७, दोन्ही रा. आमोदा, ता.यावल) यांना ताब्यात घेऊन यांच्याकडून ॲपेरिक्षासह दीड लाख रुपये किमतीचे साहित्य जत्त केले. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर चौधरी तपास करीत आहेत. संशयितांना रावेर न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.