Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : जळगावमधील 481 थकबाकीदारांच्या मालमत्तांचा 22 डिसेंबरला लिलाव

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : मालमत्ताकर तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा महापालिका प्रशासनाकडून २२ डिसेंबरला लिलाव होईल. प्रशासनाकडून ५१९ मालमत्ताधारकांना जप्तीचे अधिपत्र बजावण्यात आले होते. त्यापैकी ४८१ जणांनी थकबाकी न भरल्यामुळे त्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल.(Auction of properties of 481 defaulters in Jalgaon on December 22 jalgaon municipality news)

लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यास आयुक्तांना एक रुपये बोली लावण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. आयुक्त एक रुपयांची बोली लावतील व त्या मालमत्ता महापालिकेच्या नावाने केल्या जातील. तसेच अधिपत्र बजावल्यानंतर ४० मालमत्ताधारकांनी थकबाकी भरल्यामुळे त्यांच्या मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात येतील.

२२ डिसेंबरच्या आधी मालमत्तांची थकबाकी भरणाऱ्यांना लिलावातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची संधी म्हणून थकबाकीदारांनी तातडीने थकबाकी भरावी अन्यथा लिलावास सामोरे जावे, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

चार कोटी ४३ लाखांची थकबाकी

शहरातील तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून मालमत्ताकर न भरणाऱ्या ५१९ मालमत्ताधारकांकडे चार कोटी ६१ लाख २३ हजार ८९६ रुपयांची थकबाकी थकीत होती.

त्यापैकी ४० मालमत्ताधारकांनी १७ लाख ५२ हजार ५८३ रुपयांची थकबाकी भरली. ४८१ मालमत्ताधारकांकडे चार कोटी ४३ लाख ७१ हजार ३१३ रुपयांची थकबाकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT