Election  sakal
जळगाव

Jalgaon News : नवमतदारांना आगाऊ नोंदणीची संधी : आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगातर्फे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या तरुण-तरुणींना मतदार नाव नोंदणीची संधी मिळणार आहे.

ज्यांची नोंदणी राहिली आहे, अशा मतदारांनी नाव नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.(Ayush Prasad statement of Advanced registration opportunity for new voters jalgaon news)

जळगाव जिल्ह्यात ३४ लाख ५६ हजार ४८९ मतदार आहेत. त्यामध्ये १७ लाख ९९ हजार २९० पुरुष तर १६ लाख ५७ हजार ०७६ महिला आहेत. ज्यांची नोंदणी राहिली आहे अशा नवीन मतदारांनी नाव नोंदणी करावयाची आहे.

२७ ऑक्टोबर २०२३ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. १ जानेवारी २०२४ रोजी अथवा त्याआधी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

२ डिसेंबरला नावनोंदणी शिबिर

मतदार यादीत १२७ तृतीयपंथी मतदार नोंद आहे. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर २०२३ ला नावनोंदणीसाठी विशेष शिबिर होणार आहे. ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या समाज घटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत.

या समाजघटकाकडे वास्तव्य आणि जन्म तारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्वयं घोषणापत्राची सवलत दिली आहे. कोणतेही कागदपत्र नसले तरी यांना मतदार नोंदणी करता येणार आहे.

ऑनलाइन सुविधा

ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी मतदारांना voters.eci.gov.in आणि आपली नावे मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी ceo.maharashtra gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार यादीसंबंधी काही माहिती अथवा दुरुस्ती असल्यास संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : हे काय...! Yuzvendra Chahal हा रोहित शर्मापेक्षा महागडा खेळाडू ठरला, पंजाब किंग्सने एवढा पैसा ओतला

Mobile Overuse : मोबाईलचा जास्त वापर करायची सवय सुटत नाहीये? मिनिटांत करा सोपी ट्रिक, कामाशिवाय बघू वाटणार नाही फोन

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचा निकाल अनपेक्षित, कारण वास्तविकता वेगळी होती- जितेंद्र आव्हाड

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT