Road potholes between Raver - Vivara. esakal
जळगाव

Jalgaon News : अंकलेश्र्वर- बऱ्हाणपूर महामार्ग बनलाय मृत्युचा साफळा; 66 कोटींतून थातूरमातूर डागडुजी

अंकलेश्र्वर - बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाची रावेर- सावदा दरम्यान रावेर- सावदा दरम्यान ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. याबाबत वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अंकलेश्र्वर - बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाची रावेर- सावदा दरम्यान रावेर- सावदा दरम्यान ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. याबाबत वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

काही ठिकाणी दुरुस्ती झाली आहे, पण ती इतकी थातूरमातूर आहे की, या कामी ६६ कोटी रुपये खर्च झाले असतील यावर वाहनधारक विश्वास ठेवायला तयार नाहीत. (bad road condition on Ankleshwar Burhanpur highway jalgaon news)

तळोदा - बऱ्हाणपूर हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतल्यापासून त्याची देखभाल दुरुस्ती रखडली होती. रस्त्याची काही ठिकाणी खूपच दुरवस्था झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दुरुस्तीसाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र ती थातूरमातूर झाली आहे.

खासदारांच्या पत्राला टोपली

सावदा - रावेर ते मध्यप्रदेशची सरहद्द चोरवडपर्यंत अनेक ठिकाणी खूपच दुरवस्था झाली आहे. विवरा - रावेर दरम्यान खूपच खड्डे आहेत. पावसाळ्यानंतर ते ठेकेदाराने काही ठिकाणी भरले, मात्र बहुतेक खड्डे ‘जैसे थे’ आहेत. जिथे खड्डे भरले आहे तिथे डांबराचा वापर पुरेसा न झाल्याने ते पुन्हा उखडले आहेत.

या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. एक खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला की दुसरा समोर आलाच म्हणून समजा. हा सध्याचा राज्य मार्ग व नियोजित राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न पडावा अशी या रस्त्याची स्थिती झाली आहे.

ठेकेदाराने केलेल्या या थातूरमातूर दुरुस्तीकडे 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नसल्याचे वाहन धारकांचे म्हणणे आहे. या दुरुस्तीबाबत खासदार रक्षा खडसे यांनी एकदा पत्र लिहिले पण अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदाराने त्या पत्राला केराची टोपलीच दाखविलेली दिसते.

दुरुस्ती खर्च पाण्यात

जळगाव येथे नुकत्याच झालेल्या ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही श्रीमती खडसे यांनी हा दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यावर ही अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. या दुरुस्तीसाठी खर्च केलेले ६६ कोटी रुपये पाण्यात गेल्याची वाहनधारकांची भावना आहे. न्हाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दुरुस्तीची पाहणी करून पुन्हा नीटनेटकी दुरुस्ती करून घ्यावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT