Bail Pola Festival 2023 esakal
जळगाव

Bail Pola Festival 2023 : शेतकऱ्यांच्या बैलपोळ्याला महागाईचा चटका! साहित्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

Bail Pola Festival 2023 : शेतकऱ्यांबरोबर बारा महिने शेतात राबणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र बैल. या मित्राच्या ऋणातून मुक्त होण्याचा सण म्हणजे पोळा. मात्र आता यांत्रिक शेतीने सर्जा जोडीचा वापर अत्यल्प प्रमाणात होत असल्याने ही संख्या रोडावली असली तरी यंदा पावसाच्या आगमनाने बैलपोळ्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

कृषी व्यवसायात दिवसेंदिवस मनुष्य बळाचा वापर अत्यल्प होत आहे. त्याबरोबरच नैसर्गिक तसेच शासकीय अवकृपेमुळे शेती बेभरवशाची होऊन बैलांचे संगोपन करणे सोपे राहिले नाही. (Bail Pola Festival 2023 20 percent increase in material rates jalgaon news)

पशु संगोपनासाठी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेला चारा, वैरणाच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे बैलाकडून शेती करून घेणे अशक्यप्राय होत चालले आहे. चाळीस वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्याकडे वीस पंचवीस बैलांची जोडी होती, त्यांच्याकडे आता एक बैल देखील पाहावयास मिळत नाही.

एरवी बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलांना पूर्णपणे सुटी असायची. आदल्या दिवशीच पोळ्यासाठी त्यांना भरपूर प्रमाणात हिरवे गवत उपलब्ध करून ठेवले जायचे. सकाळी बैलांना नदीवर अथवा पाटावरील पाण्यात धुऊन स्वच्छ केले जायचे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वच्छ झालेल्या बैलांच्या रंगविले जायचे. सायंकाळी सर्व बैलांची एकत्र मिरवणूक काढून त्यांचे औक्षण करून बैलांना पुरणपोळी भरवली जात. आता मात्र या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले असून, बैलांची कमी होत असलेली संख्या, महागाईचा फटका सण-उत्सवाला बसू लागला आहे.

असे आहेत साहित्याचे दर

माटुट जोड : १५० ते २०० रुपये नग

मोरकी : ५० ते १६० रुपये एक नग

रेशम कासरा : १२० रुपये ते ४०० रुपयेपर्यंत

पितळी तोडे : १००० रुपये किलो

पितळी घोगर : १००० ते १२५० रुपये किलो

पितळी घंटी :८०० ते १००० रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT