Jalgaon: Pandit Uday Shankar presenting the invention of Chitravenu instrument. Ramakrishna Karambelkar accompanying him on tabla esakal
जळगाव

Balgandharva Music Festival : ‘चित्रवेणू’ अविष्कार अन् शास्त्रीय संगीताची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चित्रवेणू वादकाची स्वत:ला चिकारीसारखी तारेची साथ देण्याची क्षमता तसेच मधुर, सूर आणि पाश्चात् संगीताच्या अनुभूतीसह बासरी, सिताराच्या शतताराचा संगम असलेल्या चित्रवेणूतून मिश्र भैरवी रागातील धून पंडित उदय शंकर यांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतात कट्यार काळजात घुसलीमधील किरवानी रागातील ‘दिल की तपिष’, ‘रानी तेरो चिरजीयो’, ‘नामगाऊ नामध्याऊ’ या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली.(Bal Gandharva Festival Chitravenu invention and realization classical music Pandit Uday Shankar enchanted fans Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात लंडन येथील डाॕ. लिना परदेशी, कॕनडा येथील मोहन कोरान्ने, ‘समाजकल्याण’चे आयुक्त योगेश पाटील, जैन इरिगेशनचे व्हाइस प्रेसिडेंट (पर्सोनल) चंद्रकांत नाईक, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांच्या उपस्थितीत दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

द्वितीय दिनाची सुरुवात चित्रवेणू या नवीन वाद्यावर पंडित उदय शंकर यांनी सुरवातीला ‘राग यमन’मध्ये जोड, झाला अतिशय उत्तमरित्या सादर केला. हा राग मध्य लय रूपक या तालात निबद्ध होता व बंदिश द्रुत तीनतालात सादर केली. यानंतर मिश्र भैरवी रागातील धून वाजविली. पंडित उदय शंकर यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर केले.

पंडितजींशी प्रश्नोत्तराचे एक उत्तम सेशन झाले. यामध्ये मुलाखतीच्या रूपाने सुसंवादिनी दीप्ती भागवत यांनी बोलतं केलं. यात चित्रवेणू वाद्याविषयी सांगितले. बासरीच्या ध्वनी किंवा आवाजावर आणि वाऱ्याच्या यापूर्वी कधीही न वाजविले गेलेले भारतीय अभिजात संगीत वाजविण्याची क्षमता असलेले चित्रवेणू वाद्याची अनुभूती जळगावकरांना विश्लेषणासह घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT