OBC Reservation : ओबीसीची चळवळ दडपण्यासाठी छगन भुजबळांना टार्गेट केले जात आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत ‘ओबीसीं’साठी उभारलेला लढा दबला जाणार नाही, असा विश्वास अखिल भारतीय समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केला.
ते भडगाव येथील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात आयोजित ओबीसी आरक्षण अधिकार महामेळाव्यात बोलत होते.(balasaheb kardak statement of Bhujbal target for suppression of OBC movement jalgaon news)
बाळासाहेब कर्डक पुढे म्हणाले, की ओबीसी समाजबांधवांना मिळालेले आरक्षण हे समाज व्यवस्थेत शूद्र असल्याने मिळाले. हजारो वर्षे गावगाड्यातील सेवा केली. मिळेल ती कामे केली. समाज व्यवस्थेने हीन पणाची वागणूक दिली म्हणून घटनेने आरक्षण दिले. पुढे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण लागू करण्यात आले. छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजघटकांना एकत्र करून ते महाराष्ट्रात लागू केले. ओबीसी आरक्षण चळवळीचे सरसेनापती भुजबळ आहेत, असेही श्री. कर्डक म्हणाले.
या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, संपर्कप्रमुख अनिल नाळे, नाशिक शहराध्यक्ष उमेश महाजन, हरिश महाजन, तालुकाध्यक्ष भानुदास महाजन, शहराध्यक्ष भिकन महाजन, शिवदास महाजन, कैलास महाजन, विजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन, महिला जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, कुंभार समाज अध्यक्ष डॉ. करणकाळ, सी. सी. वाणी, अशोक खलाणे, भीमराव खलाणे, जगन्नाथ महाजन, श्री. काळे, डॉ. उत्तमराव महाजन, टाकळी प्र.चा. सरपंच कविता महाजन, भगवान महाजन, नितीन महाजन, देवराम महाजन, भगवान रोकडे, प्रदीप महाजन, दिनेश पाटील, रवीद्र महाजन, शालिकराम महाजन.
प्रकाश महाजन,विजय लक्ष्मण महाजन उद्धव महाजन, बाळासाहेब महाजन, प्रकाश महाजन, सुरेंद्र विठ्ठल महाजन, विजय नावडकर, कपिल चौधरी, श्याम पाटील, अविनाश माळी, संतोष महाजन, प्रकाश महाजन, सुनील शिंदे, सुनील कासार, मनोहर चौधरी, जकीर कुरेशी, विठोबा मिस्तरी, संजय पवार, आबा वाणी, विविध ओबीसी आरक्षण चळवळीचे कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते. सुरेश रोकडे, सोनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास महाजन यांनी आभार मानले.
चळवळीतील कार्यकर्ता सक्षम
बाळासाहेब कर्डक छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजघटकांना एकत्र करून ते महाराष्ट्रात लागू केले. ओबीसी आरक्षण चळवळीचे सरसेनापती भुजबळ आहेत. न्यायालयीन राजकीय सामाजिक पातळीवर लढत आहेत. म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात आहेत. जेणेकरून ओबीसी आरक्षण चळवळ दडपली जाईल, पण प्रत्यक्षात तसे होणे शक्य नाही. चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता समता सैनिक सक्षम आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.