जळगाव : पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून लमांजन येथे तरुणासह घरातील चौघांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beating 4 members of farmers family due to anger for filing complaint at police station jalgaon news)
जळगाव तालुक्यातील लमांजन येथील तरुण शेतकरी युवराज वाल्मीक पाटील (वय २५) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत.
युवराज पाटील याचा भाऊ पवन पाटील याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या रागातून गावात राहणारा अशोक रामचंद्र पाटील याच्यासह इतर दहा जणांनी शनिवारी (ता. ११)
सायंकाळी पाचच्या सुमारास युवराज पाटील, भाऊ पवन पाटील, वडील वाल्मीक पाटील आणि काकू अक्काबाई पाटील यांना राहत्या घरासमोरील ओट्यावर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
या मारहाणीत चौघे जण गंभीर जखमी झाले. जखमींच्या तक्रारीवरून रात्री अकराला युवराज पाटील याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अशोक रामचंद्र पाटील, सोपान अशोक पाटील, अमोल भागवत पाटील, पुंडलिक दामू पाटील, बबन राजू वाघ, प्रदीप कैलास पाटील, भागवत रामचंद्र पाटील, नितीन पुंडलिक पाटील, कैलास देवीदास पाटील, साहेबराव दामू पाटील आणि दशरथ साहेबराव पाटील (सर्व रा. लमांजन) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.